अमरावती – मोर्शी शहरात एका युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना मोर्शी शहर हादरले

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अमरावती – मोर्शी शहरात एका युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना मोर्शी शहर हादरले

नवी मुंबई (मंगेश जाधव)-गुरुवारी सकाळी 7 वाजताचे सुमारास उघडकीस आली. मोर्शी ते अमरावती मार्गावर येरला गावाजवळ असलेल्या शिरभाते मंगल कार्यालयाजवळ ही घटना घडली. मृत तरुणाचं नाव सुनील अनंत चवरे, वय 9 वर्ष आहे.

घटनास्थळी पोलिसांचा ताफा – तरुण युवकाचा मृतदेह शेताच्या काटेरी कुंपणात नग्नावस्थेत आणि डोक्यावर प्रहार करण्यात आलेला मोठा दगड रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर, अमरावती येथील ग्रामीण पोलीस, अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मोर्शीचे ठाणेदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात मोर्शी पोलिसांचा ताफा घटनस्थळी तैनात करण्यात आला. श्वानपथक आणि मोबाईल युनिट तसंच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांनासुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आलं.

फोन आला आणि घरून निघाला – याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोर्शी शहरातील श्रीकृष्ण पेठ येथील अरविंद रवाळे यांचे घरी अनंत चवरे हे पत्नी आणि आपल्या दोन मुलांसह गेल्या आठ ते दहा वर्षापासून भाड्याने राहात आहेत. 23 जानेवारी रोजी संध्याकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मृतक सुनील चवरे याने आपले वडील अनंत यांच्याकडे अंगातील जर्किन काढून दिले होते. त्यावेळी त्याच्या मोबाईलवर फोन येत असताना तो घरून सिंभोरा चौकातून येतो, म्हणून सांगून गेला. मात्र तो रात्री घरी परत आला नसल्यामुळे अनंत चवरे आणि त्यांच्या पत्नी यांनी मोर्शी पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगा घरी परत आला नसल्याची तक्रार दिली होती.पेट्रोल पंप आणि दारू दुकानात करायचा काम – मृतक सुनील चवरे हा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे, हॉटेल बारवर दारूच्या दुकानात काम करायचा. त्याचा खून नेमका कुणी केला असावा, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा छडा लवकरच लागेल असं पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितलं

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न