न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथे 76 वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथे 76 वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा…

तळवली (मंगेश जाधव)

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ट महाविद्यालय तळवली, ता. गुहागर,जि. रत्नागिरी या प्रशालेत 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.*
*प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एम.ए.थरकार सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी एमसीसीचे संचलन उत्कृष्ट पद्धतीने केले. तसेच प्रशालेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत,राज्यगीत,ध्वजगीत व देशभक्तीपरगीत अत्यंत तालासुरात गायल्यामुळे शाळा परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतातील राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्यांतील लोकांच्या वेशभूषेत त्या राज्यांच्या भाषेत तेथील वैशिष्ट्ये सांगितली. या विद्यार्थ्यांनी त्या राज्यांच्या भाषेत व वेशभूषेत प्रत्यक्ष सादरीकरण केल्यामुळे एक नाविन्यपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कु. स्वरा साळवी व इयत्ता नववी ची विद्यार्थीनी कु. श्रावणी पवार या विद्यार्थीनीनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुंदर अशी भाषणे केली.*
*प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून “चतुरंग प्रतिष्ठानचे सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार” मिळवलेली विद्यार्थीनी कु.माही प्रकाश मयेकर हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच संविधान अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षीस वितरणही करण्यात आले. त्यानंतर तालुकास्तरीय विज्ञान रंजन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावलेला विद्यार्थी कु.मंथन साळवी या विद्यार्थ्याचा रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.*
*भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘ 76 R D ‘ (रिपब्लिक डे) अशी मानवी प्रतिकृती तयार केली होती. हे या कार्यक्रमाचे एक वेगळे आकर्षण होते. त्यानंतर ज्युनियर काॅलेजचे प्रा.अमोल जड्याळ सर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार दिला. तर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रशांत केळस्कर यांनी सर्व विद्यार्थ्यांना थंड पेय म्हणून फ्रुटी दिली. तसेच एमसीसीच्या विद्यार्थ्यांना संकलनासाठी लागणारे कॅपही देणगी म्हणून दिली.तसेच तळवली ग्राम पंचायत,शृंगारतळी येथील व्यवसायिक श्री.स्वप्नील नांदलस्कर, श्री.संजय आग्रे यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेटस् दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमास जेष्ठ नागरिक श्री. शंकर चौघुले साहेब, श्री. राजन चौघुले साहेब, टी. व्ही. सिरीयलचे तंत्र निर्देशक,निवेदक व सूत्रसंचालक श्री.रविंद्र पवार व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.*
*प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री. बागल सर, कला शिक्षक श्री.कुळे सर, श्री पुनस्कर सर, सौ.कांबळे मॅडम,सौ.नाईक मॅडम, जेष्ठ शिक्षक श्री. देवरुखकर सर, श्री. केळस्कर सर,श्री.साळुंके सर, श्री. गवळी सर, श्री.गुरसळे सर, प्रा.जड्याळ सर, प्रा सौ. जड्याळ मॅडम, प्रा. सौ. आयरे मॅडम,प्रा.सावंत मॅडम यांनी केले होते.तसेच लिपिक श्री.कदम सर, श्री.अक्षय चव्हाण, श्री. प्रणय आरोलकर यांचे मोलाचे योगदान होते. या सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री एम ए थरकार सर यांनी आभार व्यक्त केले*

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न