धोपेश्वर पन्हळे तर्फे राजापूर अनधिकृत मदरसा विरोधात सलग दुसऱ्या दिवशी स्थानिक ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू च….

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

धोपेश्वर पन्हळे तर्फे राजापूर अनधिकृत मदरसा विरोधात सलग दुसऱ्या दिवशी स्थानिक ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरूच जोपर्यंत मदरसा बंद होत नाही तोपर्यंत माघार नाही ग्रामस्थांचा थेट इशारा

 

राजापूर .(प्रतिनिधी-पुरुषोत्तम खांबल)

शहरालगतच्या धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरसा यापूर्वीच्या शासनाच्या आदेशाना न जुमानता सुरुच असल्याने व प्रशासन या मदरशाबाबत कोणतीही कठोर कारवाई न करता व स्थानिक ग्रामस्थांचे मत ऐकून न घेता एकतर्फी निर्णय देत असल्याने २६ जानेवारी २०२५पासून सदर अनधिकृत मदरसा बंद होईपर्यंत साखळी उपोषणाला पन्हळेतर्फे राजापूरच्या ग्रामस्थांनी सुरुवात केली आहे. सदर उपोषणाला राजापूर प्रांताधिकारी डाॅ.जास्मिन यांनी थेट दिली व आठ दिवसात यावर निर्णय घेतला जाईल तुर्तास उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतू मॅडम वर्षभर प्रशासन आम्हाला झुलवत आहे. त्यामुळे तुम्ही कारवाई करा मग आम्ही लगेचच उपोषण स्थगित करतो अशी भुमिका उपोषणकर्त्यांनी मांडली. पन्हळेतर्फे राजापूर या महसुली गावातील अनधिकृत मदरसा हा अत्यंत ज्वलंत, तसेच धार्मिक तेढ वाढविणारा विषय असून सदरहू मदरसा कायमस्वरूपी बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे. यासाठी प्रथम २६ जानेवारी २०२४ रोजी आमरण उपोषण पुकारण्यात आले होते मात्र त्यावेळी तहसिलदार राजापूर यांनी तहसिलदार दालनामध्ये सदर दारुल हबीब जनरल एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर ट्रस्ट आणि पन्हळे तर्फे राजापूरचे ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक घेतली होती. मात्र सदर बैठकीला नायब तह‌सिलदार यांनी एकतर्फी भूमिका घेत ग्रामस्थांना आपले म्हणणे मांडण्याची सुयोग्य संधीही न देता सदर संस्थेला त्यांच्या इच्छेला येईल, तिथे भारतात कोठेही मदरसा चालू करून शकतात, असा कायदा असल्याचे ग्रामस्थानाच सुनावले होते. त्यांची ही एकतर्फी भूमिका न पटल्यामुळे व ती भूमिका ग्रामस्थांवर अन्याय करणारी असल्यामुळे २६ जानेवारी २०२४ रोजी ध्वजवंदनानंतर ग्रामस्थाना उपोषण करण्यास भाग पडले होते. याच उपोषणावेळी तत्कालीन तहसिलदार शितल जाधव यानी व्यक्तीशः उपोषणास्थळी येवून ग्रामस्थांशी चर्चा करताना फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत या विषयात समंजस्य बैठक घेण्याचे वचन दिले. त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी २६ जानेवारी २०२४ रोजीचे आमरण उपोषण तूर्तास स्थागित केले होते. मात्र त्यानंतर फेब्रुवारीअखेर आली, तरीही महसूल प्रशासनाकडून सदर सामंजस्य बैठक घेतली गेली नाही. म्हणून तोंडी विचारणा केली असता १ मार्च २०२४ रोजी प्रांताधिकारी यांचे पत्रावरून तहसिलादर दालनामध्ये घेतली गेली, त्या बैठकीत ही ग्रामस्थानां मान्य नसताना तहसिलदार, उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांचे शब्दाला मान देण्यासाठी सदर दारुल हबीब संस्थेला ३ महिन्याची म्हणजेच ३० मे २०२४ पर्यंतची मुदत देण्याचा पर्याय ग्रामस्थांनी मान्य केला. या मुदतीमध्ये सदर संस्थेने सर्व प्रकारच्या कायदेशीर परवानग्या घेतल्या तरच सदर मदरसा चालू ठेवता येईल, अन्यथा तो अनधिकृत मदरसा संपूर्णतः बंद करावा लागेल, असे या बैठकीत ठरवण्यात आले होते, असेही या वेळी उपोषणकर्त्यांनी प्रांताधिकार्‍यांसमोर स्पष्ट केले आहे.

उपरोक्त ३ महिन्याच्या मुदतीत म्हणजेच ३० मे २०२४पर्यंत सदर संस्थेने कोणतीही परवाणगी न मिळविता व भारतीय कायद्याचा कोणत्याही प्रकारे मान न ठेवता सदर मदरसा उद्दामपणे सुरू ठेवला आहे. याबाबत वेळोवेळी प्रशासनाला तोंडी व लेखी कळवून सुद्धा त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही वा कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी २६ जानेवारी २०२४ रोजी तूर्तास स्थगित केलेले आमरण उपोषण १५ ऑगस्ट २०२४ रोजी पुनश्चः करण्याची नोटीस दिली. सदर नोटीस प्रशासनाला पोहोचताच उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतिरिक्त कार्यभार असलेले जीवन देसाई रत्नागिरी यांचे अध्यक्षतेखाली १२ ऑगस्ट २०२४ रोजी उपविभागीय अधिकारी राजापूर यांचे दालनात सदर दारुल हबीब संस्था व पन्हळेतर्फे राजापूर ग्रामस्थ यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, सरपंच ग्रामपंचायत धोपेश्वर व सर्व सदस्य, तसेच ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत दिवाळीच्या सुट्टीपर्यंत म्हणजेच १५ नोव्हेंबरपर्यंत निव्वळ तेथील विद्याथ्यांचे शैक्षणिक नुक्सान होऊ नये म्हणून सदर मदरसा सुरू ठेवण्याच्या पर्यायाला ग्रामस्थांच्या मनाविरुद्ध उपस्थित सर्व मान्यवरांच्या शब्दाला मान देण्यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून व सहिष्णूतेच्या भावनेतून येथील ग्रामस्थानी मान्यता दिली. मात्र सदर बैठक घेऊन दिवाळीची सुट्टी संपून तीन महिन्यांचा कालावधी होऊन ही सदर संस्थेने कोणतीही परवानगी प्राप्त केलेली नाही व सदर अनधिकृत मदरसा सुरुच ठेवला आहे. प्रशासनाची ही भूमिका ग्रामस्थांना संशयास्पद व शंकास्पद वाटत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी बैठकीत ठरले असूनही सदर अनधिकृत मदरसा बंद करण्यासाठी कोणतीही कार्यवाही वा कारवाई किंवा दोन्ही अद्याप केलेली नाही त्यामुळे दि. २६ जानेवारी २०२५ रोजी यापूर्वी स्थगित केलेले आमरण उपोषण साखळी पद्धतीने पुन्हा सुरु करण्यात आले आहे. मात्र या वेळी सदर अनधिकृत मदरसा पूर्णतः बंद होईपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याच्या मध्यस्तीला अथवा आश्वासनाला विचारात घेतले जाणार नाही. मात्र हा अनधिकृत मदरसा पूर्णतः बंद करेपर्यंत आमरण साखळी उपोषण सुरु राहणार असून पुढील होणार्‍या परिणामास प्रशासन जबाबदार असेल असा इशारा पन्हळे तर्फे राजापूरच्या ग्रामस्थानी प्रशासनाला दिला आहे. यावेळी अमोल सोगम,पुरषोत्तम खांबल, धोपेश्वरचे माजी सरपंच दादा सोगम, संदिप सोगम, अरु मांजरेकर आदी पन्हळेतर्फ राजापूर ग्रामस्थांसह भाजप जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव, महिला तालुकाध्यक्ष सौ.सुयोगा जठार ,कोषाध्यक्ष विवेक गुरव,शिवसेना (ठाकरे गट) विभाग प्रमुख संतोष हातणकर, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश मयेकर, निकेश पांचाळ विश्वहिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष. अद्वैत अभ्यंकर, संदेश टिळेकर, दिलिप गोखले आदि हिंदू संघटनांचे पदाधिकारी या उपोषणात सहभागी झाले होते. सदर प्रकरणावर प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास मोठा उद्रेक होण्याची शक्यता असल्याचे या विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांकडून पत्रकारांशी बोलताना सांगण्यात आले.

Purushottam Khambal
Author: Purushottam Khambal

पुरुषोत्तम खंबल. ???? डिजिटल मिडिया प्रतिनिधि - राजापुर ???? धोपेश्वर, ता. राजापुर , जि.रत्नागिरी

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ – नाट्यलेखन स्पर्धा

लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ - नाट्यलेखन स्पर्धा मुंबई : नवोदित तसेच, प्रस्थापित लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्तीस व्यासपीठ मिळावे, मराठी नाट्यसंपदा अधिक...
Read More
लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ – नाट्यलेखन स्पर्धा

प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय

प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे इंडियन प्रीमियर...
Read More
प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय

आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार

आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार रत्नागिरीत बागायतदारांचा एल्गार; ४ एप्रिलला देवगडमध्ये होणाऱ्या...
Read More
आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार

ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात

ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): , ईडन गार्डन्स, कोलकाता...
Read More
ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश अधिकारी घडविण्याची परंपरा कायम आबलोली (संदेश कदम) चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार...
Read More
शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह रत्नागिरी :- निलेश रहाटे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हयांचे ऑगस्ट...
Read More
लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे कोकणातील मत्स्यव्यवसायाला चालना, कोळंबी निर्यातीत मोठी झेप...
Read More
महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान

स्वातंत्र क्रिडा मंडळ” भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने

"स्वातंत्र क्रिडा मंडळ" भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने किंग जॉर्ज वृध्दाश्रम- महालक्ष्मी येथे वयोवृध्दांना "भोजन दान" आणि जीवनावश्यक वस्तूंचे...
Read More
स्वातंत्र क्रिडा मंडळ” भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने

नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय – लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार

नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय - लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार आबलोली...
Read More
नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय – लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार

मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६- रत्नागिरी जिल्ह्यात रिद्धी लबडे प्रथम

मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६- रत्नागिरी जिल्ह्यात रिद्धी लबडे प्रथम आबलोली (प्रतिनिधी) मंथन वेल्फेअर फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मंथन जनरल...
Read More
मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६- रत्नागिरी जिल्ह्यात रिद्धी लबडे प्रथम