शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना –
ॲग्रिस्टॅक योजना’अंतर्गत पिक पाहणीसाठी आधार लिंक अनिवार्य!
✍️राजू सागवेकर /राजापूर
????????राजापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंर्वधन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासन निर्णयानुसार ॲग्रिस्टॅक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून गावातील सर्व शेतकऱ्यांचे पिक पाहणी व नोंदणी डिजिटल स्वरूपात केली जाणार आहे.
????????यासाठी प्रत्येक शेतकऱ्याचे आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतींनी आपल्या गावातील CSC केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) यांच्या सहकार्याने कॅम्पचे आयोजन करून शेतकऱ्यांचे आधार लिंक करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावयाची आहे.
????????ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत डेटा ऑपरेटर व केंद्रचालकांना या प्रक्रियेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असून, संबंधित ग्रामपंचायतींनी हे काम प्राधान्याने करून घ्यावे.
????????या कामाचा वारंवार जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी या कामात कोणतीही दिरंगाई न करता तातडीने ॲग्रिस्टॅक योजनेचे काम पूर्ण करावे, असे निर्देश पंचायत समिती, राजापूरचे गटविकास अधिकारी यांनी दिले आहेत.
अधिक माहितीसाठी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा.















