राजापूर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेच्या मंजुरीस विलंब ? – लाभार्थ्यांना प्रतीक्षा

राजापूर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेच्या मंजुरीस विलंब ? – लाभार्थ्यांना प्रतीक्षा

✍️राजू सागवेकर :- राजापूर

????????राजापूर तालुक्यातील अनेक गरजू नागरिकांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी मागील सहा महिन्यांपासून अर्ज केले असले तरी अद्याप त्यांना मंजुरी मिळालेली नाही. यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

????????राजापूर तहसील कार्यालयात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापासून शेकडो अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, तालुक्याची संजय गांधी निराधार समिती स्थापन न झाल्यामुळे आणि प्रस्तावांवर सह्या कोण करणार याबाबत जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टता नसल्याने अर्ज प्रलंबित राहिले होते.

????????यासंदर्भात तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गदर्शन मागवले होते. आता जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदारांना स्वतः कागदपत्रे तपासून मंजुरी देण्याचे निर्देश दिले आहेत.

???????? त्यामुळे लाभार्थ्यांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. तहसीलदारांकडून लवकरच अर्ज निकाली काढले जातील आणि पात्र लाभार्थ्यांना तातडीने अनुदान मिळेल , अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें