लोकसभा निवडणुकीत जर आमच्या हातातून एक जरी चूक झाली असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो; भरत गोगावलें

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लोकसभा निवडणुकीत जर आमच्या हातातून एक जरी चूक झाली असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो; भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना खुलं आव्हान

महाड– गेल्या काही दिवसांपासून

लोकसभा निवडणुकीत जर आमच्या हातातून एक जरी चूक झाली असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो; भरत गोगावलें

महायुती सरकारच्या मंत्र्‍यांमध्ये धूसफूस सुरु असल्याची चर्चा आहे. महायुती सरकारने पालकमंत्री पदाची यादी जाहीर केल्यानंतर काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री मिळालं नाही, त्यामुळे त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. खरं तर रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले इच्छुक होते. मात्र, रायगडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या तथा मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलं होतं. त्यामुळे रायगडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीत चांगलंच राजकारण तापलं. त्यानंतर अखेर राज्य सरकारने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली.

यानंतर आता भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदावरून खासदार सुनील तटकरे यांना खुलं आव्हान दिलं आहे. ‘लोकसभेच्या निवडणुकीत जर आमच्या हातातून एक जरी चूक झाली असेल तर मंत्रि‍पदाचा राजीनामा देतो. पण एक तरी चूक दाखवून द्यावी’, असं आव्हान मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांना दिलं आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदाचा वाद चांगलाच विकोपाला गेल्याची चर्चा रायगडच्या राजकारणात आहे. आमची तयारी आहे. ज्याला कर नाही त्याला डर कशाला? मी आज आव्हान देतो, लोकसभा निवडणुकीच्या वेळी जर आमच्या हातातून एक जरी चूक झाली असली तरी आज लाडक्या बहि‍णींच्या समोर सांगतो, मंत्रि‍पदाचा राजीनामा देतो.

ज्यांनी आमच्या चुका सांगितल्या ना, त्यांनी आमची एक तरी चूक दाखवून द्यावी”, असं खूलं आव्हान मंत्री भरत गोगावले यांनी दिलं आहे. दरम्यान, भरत गोगावले हे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा योग्य निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असं स्पष्ट केलं होतं. मात्र, अद्याप रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री कोण होणार? यासंदर्भातील निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात? याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के