बोर्डाच्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ‘ग्रेस’ गुणांबाबत मोठा निर्णय!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

???? सा. रत्नागिरी वार्ताहर 

 

बोर्डाच्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ‘ग्रेस’ गुणांबाबत मोठा निर्णय!

 

नागपूर :– महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेवल्या आहेत. यावर्षी या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ग्रेस गुणांच्या प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे. तो बदल काय आहे, कुणाला काय फायदा होणार हे बघुया. प्रतिवर्षीप्रमाणे इयत्ता १० वी व १२ वीच्या खेळाडू विद्यार्थ्यांचे ऑफलाईन अर्ज मागविले जातात. त्या माहितीचे संकलन करुन कार्यालयाद्वारे हे गुण माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत मंडळास पाठवले जाते.*

 

सन २०२३-२४ पर्यंत ग्रेस गुण प्रक्रिया काही मानवी त्रुटीमुळे क्लिष्ट होत होती. त्याचा फटका विद्यार्थ्यांना त्यांचे गुण न मिळण्याने बसत होता. या प्रश्नावर तोडगा आणि सदर प्रक्रिया निर्दोष करण्यासाठी या वर्षीपासून ( २०२४-२५) पासून ग्रेस गुणांसाठी केली जाणारी प्रक्रिया शासनाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईन केली. सदर पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करण्याची सुविधा निर्माण करुन देण्यात आली आहे.

 

गुण न मिळाल्यास हे जबाबदार राहणार

 

खेळाडू विद्यार्थी / जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपले सरकार ॲपद्वारे या वर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. त्यासंदर्भात कोणताही खेळाडू जिल्हा क्रीडा कार्यालयास ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणार नाही व अशा प्रकारचा अर्ज कोणत्याही जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून स्वीकारला जाऊ नये. जर अशी बाब मुख्यालयाच्या निदर्शनास आली तर त्यासंदर्भात होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस संबधीत जिल्हा क्रीडा अधिकारी जबाबदार राहतील. तथापि, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचा सवलत गुणांबाबतचा ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येवू नये व उपरोक्त विषयासंदर्भात दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. त्यानुसार खेळाडू विद्यार्थी व जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील खेळाडू विद्यार्थ्यांना सदर प्रणालीद्वारे अर्ज करण्याबाबतच अवगत करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

 

ग्रेस गुणांबाबत संभ्रम काय?

 

शालेय खेळाडूना मिळणारे ‘ग्रेस’ गुणाच्या संदर्भात राज्यात संभ्रम निर्माण झाला होता.

 

प्रतिवर्षी हे गुण मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकांना खेळाडूचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे प्रत्यक्ष जाऊन द्यावे लागत होते. परंतु या वर्षापासून प्रस्ताव ऑनलाईन पाठवण्याबाबत आदेश प्राप्त झालेले आहेत. कला विषयाबाबतचे सर्व प्रस्ताव ३१ जानेवारी २०२५ पूर्वी पाठवण्याबाबत बोर्डाचे परिपत्रक शाळाना प्राप्त झाले आहे. परंतु क्रीडा ग्रेस गुणा बाबत अजून निश्चित मुदती संदर्भात कुठलेही आदेश शाळाना प्राप्त झालेले नाही, असे काही शाळांकडून सांगण्यात आले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ – नाट्यलेखन स्पर्धा

लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ - नाट्यलेखन स्पर्धा मुंबई : नवोदित तसेच, प्रस्थापित लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्तीस व्यासपीठ मिळावे, मराठी नाट्यसंपदा अधिक...
Read More
लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ – नाट्यलेखन स्पर्धा

प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय

प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे इंडियन प्रीमियर...
Read More
प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय

आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार

आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार रत्नागिरीत बागायतदारांचा एल्गार; ४ एप्रिलला देवगडमध्ये होणाऱ्या...
Read More
आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार

ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात

ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): , ईडन गार्डन्स, कोलकाता...
Read More
ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश अधिकारी घडविण्याची परंपरा कायम आबलोली (संदेश कदम) चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार...
Read More
शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह रत्नागिरी :- निलेश रहाटे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हयांचे ऑगस्ट...
Read More
लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे कोकणातील मत्स्यव्यवसायाला चालना, कोळंबी निर्यातीत मोठी झेप...
Read More
महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान

स्वातंत्र क्रिडा मंडळ” भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने

"स्वातंत्र क्रिडा मंडळ" भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने किंग जॉर्ज वृध्दाश्रम- महालक्ष्मी येथे वयोवृध्दांना "भोजन दान" आणि जीवनावश्यक वस्तूंचे...
Read More
स्वातंत्र क्रिडा मंडळ” भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने

नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय – लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार

नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय - लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार आबलोली...
Read More
नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय – लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार

मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६- रत्नागिरी जिल्ह्यात रिद्धी लबडे प्रथम

मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६- रत्नागिरी जिल्ह्यात रिद्धी लबडे प्रथम आबलोली (प्रतिनिधी) मंथन वेल्फेअर फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मंथन जनरल...
Read More
मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६- रत्नागिरी जिल्ह्यात रिद्धी लबडे प्रथम