श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची जोरदार आवक . सोमवारी मिळाला कांद्याला 2700 रुपये भाव.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची जोरदार आवक . सोमवारी मिळाला कांद्याला 2700 रुपये भाव.

नंदकुमार बगाडेपाटिल (आहिलयानगर)

श्रीगोंदा – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली असून सोमवारी एक नंबरच्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला 2700 रुपये दर मिळाला . येथे शनिवार व्यतिरिक्त आठवडाभर कांद्याची आवक होत असते व दिवसातून तीन वेळा कांद्याचा लिलाव होतो . श्रीगोंदा तालुक्यातील कांद्याची प्रतवारी चांगली असल्याने तामिळनाडू , आंध्र प्रदेश , ओडीसा , पश्चिम बंगाल , केरळ आदी ठिकाणाहून येथील कांद्याला मागणी असते . येथून बांगलादेश , दुबई , कोलंबो आदी ठिकाणी माल पाठवला जातो .

मध्यवर्ती असलेल्या श्रीगोंदा कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेजारील कर्जत , दौंड , शिरूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा आणतात . सोलापूर , कोल्हापूर , सांगली , पुणे येथील भावाप्रमाणे श्रीगोंदा येथे भाव मिळत असल्याने शेतकरी येथे आपला माल देणे पसंत करतात . कारण बेंगलोर , कोल्हापूर , सोलापूर , सांगली आदी ठिकाणी मालवाहतुकीसाठी येणारा खर्च वाचतो व दरही तोच मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी येथेच आपला माल देणे पसंत करीत आहेत . त्यामुळे दिवसेंदिवस आवक वाढत असल्याचे येथील संचालक व्यापारी लौकिक मेहता , गौरव पोखर्णा , दिपक भंडारी व मयूर बोरा यांनी सांगितले .

तालुक्यातील भानगाव , टाकळी लोणार , कोथुळ , कोसेगव्हाण , पिसोरे , तांदळी दुमाला , घोटवी , देऊळगाव , घुगलवडगाव , सुरोडी, वडाळी , चिंभळा , हंगेवाडी , बेलवंडी व परिसरातील शेतकरी नेहमीच कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करून भरपूर उत्पन्न घेत आहेत . सध्या गुलाबी कांद्याची चांगली आवक असून दोन-तीन आठवड्यानंतर गावरान कांदा येण्यास सुरुवात होईल असे व्यापाऱ्यांनी सांगितले . सोमवारी झालेल्या लिलावा मध्ये एक नंबर चांगल्या प्रतीच्या कांद्यास 2700 रुपये भाव मिळाला , तर त्याखालील दोन नंबर कांद्यास पंधराशे ते दोन हजार रुपये भाव मिळाला तर तीन नंबर कांद्यास त्यापेक्षा थोडा कमी भाव मिळाला . वाहतूक खर्च कमी लागत असल्याने शेजारील तालुक्यातील शेतकऱ्यांना मध्यवर्ती असलेल्या श्रीगोंदा येथील बाजार समितीमध्ये कांदा देणे सर्व दृष्टीने फायद्याचे वाटते . येथील व्यापाऱ्यांनी मालाचे योग्य वजन , रोख पेमेंट व चांगली सेवा देण्याची परंपरा कायम ठेवल्याने शेतकऱ्यांचा श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती वरील विश्वास वाढत आहे .

यापुढे कांदा मार्केट वर विशेष लक्ष देऊन नजीकच्या काळात काष्टी , कोळगाव व देवदैठण येथे उपबाजार सुरू करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जवळ मार्केट उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी सांगितले . ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ , वाहतूक खर्च वाचून त्यांच्या पदरात जास्त पैसे पडतील .

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

highlits

डोंबिवली पश्चिमेचा वीज प्रश्न मिटला! खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला मोठे यश२२० kV माणकोली उपकेंद्रामुळे डोंबिवलीकरांची भारनियमन आणि तांत्रिक बिघाडांतून कायमची सुटका; रेल्वे रुळांखालील केबल्सचा धोका टळला

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पी/दक्षिण प्रभाग समिती स्वीकृत सदस्य पदासाठी ॲड. दिपक सोनावणे यांचा अर्ज दाखल

पी/दक्षिण प्रभाग समिती स्वीकृत सदस्य पदासाठी ॲड. दिपक सोनावणे यांचा अर्ज दाखल नवीमुंबई (मंगेश जाधव)- तब्बल १४ वर्षांनंतर होत असलेल्या...
Read More
पी/दक्षिण प्रभाग समिती स्वीकृत सदस्य पदासाठी ॲड. दिपक सोनावणे यांचा अर्ज दाखल

हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाचा महसूल वाढेल: रामदास आठवले यांची अजब मागणी

हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाचा महसूल वाढेल: रामदास आठवले यांची अजब मागणी भिवंडी:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष आणि...
Read More
हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाचा महसूल वाढेल: रामदास आठवले यांची अजब मागणी

१ जूनपासून ६ मोठे आर्थिक बदल लागू; UPI, LPG, ATM शुल्क ते शेअर बाजार नियमांमध्ये महत्त्वाचे बदल

१ जूनपासून ६ मोठे आर्थिक बदल लागू; UPI, LPG, ATM शुल्क ते शेअर बाजार नियमांमध्ये महत्त्वाचे बदल   UPI व्यवहार...
Read More
१ जूनपासून ६ मोठे आर्थिक बदल लागू; UPI, LPG, ATM शुल्क ते शेअर बाजार नियमांमध्ये महत्त्वाचे बदल

10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा 2 लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे...
Read More
10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

डोंबिवली पश्चिमेचा वीज प्रश्न मिटला! खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला मोठे यश२२० kV माणकोली उपकेंद्रामुळे डोंबिवलीकरांची भारनियमन आणि तांत्रिक बिघाडांतून कायमची सुटका; रेल्वे रुळांखालील केबल्सचा धोका टळला

डोंबिवली पश्चिमेचा वीज प्रश्न मिटला! खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला मोठे यश २२० kV माणकोली उपकेंद्रामुळे डोंबिवलीकरांची भारनियमन आणि तांत्रिक...
Read More
डोंबिवली पश्चिमेचा वीज प्रश्न मिटला! खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला मोठे यश२२० kV माणकोली उपकेंद्रामुळे डोंबिवलीकरांची भारनियमन आणि तांत्रिक बिघाडांतून कायमची सुटका; रेल्वे रुळांखालील केबल्सचा धोका टळला

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प एसटी महामंडळाचा...
Read More
ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

🌏 शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ वनविभागाची तातडीची कारवाई; अज्ञात शिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू संगमेश्वर-...
Read More
शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकंठ हरपला; वयाच्या ८९व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास मुंबई...
Read More
स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार मुंबई :...
Read More
IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट लोणीकंद परिसरातील घटना; तरुणी मुख्य सूत्रधार, ८ आरोपी अटकेत पुणे :पुणे-अहिल्यानगर...