देवरुखमधील युवा रांगोळी कलाकार विलास रहाटे यांचा राज्यपालांच्याहस्ते विशेष सत्कार

देवरुखमधील युवा रांगोळी कलाकार विलास रहाटे यांचा राज्यपालांच्याहस्ते विशेष सत्कार* 

 

देवरूख–  ( वार्ताहर) संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील युवा रांगोळी कलाकार विलास रहाटे यांचा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. विलास रहाटे यांचे रांगोळीतील योगदान तसेच मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील योगदानाबद्दल हा सत्कार करण्यात आला.

 

विलास रहाटे हे गेली तीन वर्षे मुंबई विद्यापिठाच्या युवा महोत्सवाच्या टीमला मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरविद्यापीठ, विभागीय आणि झोन तसेच राष्ट्रीय स्तरावर मुंबई विद्यापिठाला विजेतेपद मिळाले आहे. विविध स्तरावरील विजेतेपदात रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी चित्रकला, क्लेमॉडेलिंग, पोस्टर मेकिंग, रांगोळी या कलाप्रकारात पारितोषिके मिळविली आहेत. रहाटे यांनी सर्वात लहान रांगोळी काढण्यात स्वत: जागतिक विक्रम केला आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांचा राज्यपाल राधाकृष्णन् यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. राजभवन येथे झालेल्या एका कार्यक्रमात रहाटे यांना रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. ही समस्त तालुकावासियांसाठी अभिमानाची बाब आहे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें