मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये ठिकठिकाणी अनोखे फलक!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये ठिकठिकाणी अनोखे फलक!

मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये ठिकठिकाणी अनोखे फलक!

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत अपात्र धारावीकरांचे मुलुंडमध्ये पुनर्वसन करण्यास मुलुंडवासियांचा विरोध आहे. मात्र हा विरोध डावलून राज्य सरकारने नुकतीच मुलुंडमधील मिठागराची ५८.५ एकर जागा धारावीसाठी देली. त्यामुळे काही संतप्त मुलुंडवासियांनी मुलुंडमध्ये ठिकठिकाणी अनोखे फलक लावले आहेत. फलकावर नामांतर सोहळा आणि खाली मुलुंड नावावर काट मारत बाजूला नवीन धारावी असे लिहिण्यात आले आहे. मुलुंडचे नामांतर नवीन धारावी होण्याआधी जागे व्हा आणि अदानीविरोधातील आंदोलन तीव्र करा, असे आवाहन मुलुंडवासियांना करण्याचा प्रयत्न या फलकाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.*

राज्य सरकराने अपात्र धारावीकरांना धारावीबाहेर घरे देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी मुलुंड, कुर्ल्यासह अन्य काही ठिकाणची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) माध्यमातून नवभारत मेगा डेव्हल्पर्स प्रायव्हेट लिमिटेडला (एनएमडीपीएल) दिली जाणार आहे. दरम्यान, अपात्र धारावीकरांचे मुलुंडमध्ये पुनर्वसन करण्यास मुलुंडवासियांचा तीव्र विरोध आहे. यासाठी जनआंदोलन करण्यात आले होते. मात्र मुलुंडवासियांचा विरोधाला डावलून मुलुंड येथील केळकर महाविद्यालयालगतची मिठागराची ५८.५ एकर जागा केवळ ३१९ कोटी रुपयांत एनएमडीपीएलला नुकतीच देण्यात आली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जनआंदोलनातील सदस्य संतप्त झाले आहेत. सरकार मुलुंडकरांचा विश्वासघात करीत असल्याचा आरोप करीत आता मुलुंडमधील जागा धारावीसाठी देण्याच्या निर्णयाविरोधातील आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. मुलुंडमधील जागा अदानीला आंदण देऊन मुलुंडचे नवीन धारावी करण्याचा घाट घातला गेल्यानंतरही मुलुंडकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत नसल्याने जनआंदोलनातील संतप्त मुलुंडवासियांनी मुलुंडमध्ये अनोखे फलक लावले आहेत.

मुलुंडमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या फलकावर नामांतर सोहळा आणि त्याखाली मुलुंड नावावर काट मारत बाजूला नवीन धारावी असे लिहिण्यात आले आहे. तर त्याखाली शुभहस्ते, नाकर्ते राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी असेही नमुद करण्यात आले असून त्याखालोखाल उपस्थिती म्हणून झोपलेले मुलुंडकर, मुलुंडकर शब्दावर काट आणि पुढे न्यू धारावीकर असे लिहिण्यात आले आहे. तर शेवटी वेळ, लवकरच असे लिहिले गेले आहे. हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. मुलुंडचे नवीन धारावी होण्याआधी जागे व्हा आणि अदानीविरोधातील आंदोलनात मोठ्या संख्येने सामील होऊन राज्य सरकारचा डाव हाणून पाडा, असे आवाहन या फलकाद्वारे करण्यात आल्याची माहिती ॲड. सागर देवरे यांनी दिली. कोणत्याही परिस्थितीत मुलुंडचे नवीन धारावी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या
shivam