कुडाळ नगरपंचायतीच्या “नगराध्यक्ष”पदी अखेर शिवसेनेच्या सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची झाली निवड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कुडाळ नगरपंचायतीच्या “नगराध्यक्ष”पदी अखेर शिवसेनेच्या सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची झाली निवड

आमदार निलेश राणेंचे स्वप्न साकार..

सिंधुदुर्ग – कुडाळ मधील महाविकास आघाडीच्या म्हणजेच उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नगरसेविका सौ.श्रुती राकेश वर्धम या फुटल्याने अखेर कुडाळची नगरपंचायत गेली महायुतीच्या ताब्यात..

महाविकास आघाडीकडे गेली पावणे तिन वर्षे असलेली कुडाळ नगरपंचायत अखेर भाजपच्या म्हणजेच महायुतीकडे आणण्यासाठी शिंदे-शिवसेनेचे कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे व उपजिल्हा प्रमुख आनंद शिरवलकर तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना यश आले आहे.
महाविकास आघाडीतील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची एक नगरसेविका अचानक फुटल्याने,तसेच तिने आपले मतदान भाजप प्रणित सिद्धिविनायक नगर विकास आघाडीच्या नगरसेविका सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांना केल्याने पिठासीन तसेच निवडणूक अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी अखेर सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर या कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष झाल्याचे घोषित केले.तसेच कागदोपत्री जरी ही नगरपंचायत भाजप म्हणजेच महायुतीकडे असली तरी आता या कुडाळच्या नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
आमदार निलेश राणे यांनी सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर या नगराध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत,उपनेते संजय आग्रे उपस्थित होते.तसेच शिंदे-शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी “शिवसेना झिंदाबाद” कोण आला रे कोण आला” निलेश राणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा जोरदार घोषणा देत जल्लोष केला.
कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचीच सत्ता होती.महाविकास आघाडीचे ९ नगरसेवक तर महायुती आघाडीचे ८ नगरसेवक असे एकूण १७ नगरसेवक होते.तसेच महाविकास आघाडीची सत्ता असल्याने प्रत्येक नगराध्यक्षाला सव्वा-सव्वा वर्षाचा कालावधी ठरलेला होता.महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या नगरसेविका आफ्रिन करोल या २०२२ मध्ये नगराध्यक्षा झाल्या.त्यांचा सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
त्यानंतर पुन्हा काँग्रेसच्याच म्हणजेच महाविकास आघाडीच्या सौ.अक्षता खटावकर या ७ जून २०२३ रोजी नगराध्यक्ष पदी विराजमान झाल्या.त्यांनी ७ जानेवारी २०२५ रोजी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.त्यामुळे ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागली होती.तसेच सौ.अक्षता खटावकर यांनी या कुडाळ नगरपंचायतीवर तब्बल दिड वर्षापेक्षा जास्त कालावधी म्हणजेच १७ महिने त्या नगराध्यक्ष पदावर राहिल्या आहेत.त्यांच्या पाठोपाठ आता तिसऱ्यांदा हि संधी महाविकास आघाडीतील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नगरसेविका सौ.सई काळप यांना मिळणार होती.यासाठी सौ.काळप यांनी आपला अर्ज नगराध्यक्ष पदासाठी दाखल केला होता.मात्र त्यांची अखेर संधी हुकली.
कुडाळ नगरपंचायत हि महायुतीकडे आणण्यासाठी शिवसेनेचे विनायक राणे,अभिषेक गावडे,राकेश कांदे,गटनेते विलास कुडाळकर,गणेश भोगटे,चेतन पडते,चंदन कांबळी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि आमदार निलेश राणे यांच्या स्वप्नाला मूर्त रूप मिळाले.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार