बारा गावचे जागृत देवस्थान – श्रीदेव अंजनेश्वर कसबा, महाशिवरात्री उत्सव…

श्रीदेव अंजनेश्वर महाशिवरात्र उत्सव – २०२५

बारा गावचे जागृत देवस्थान – श्रीदेव अंजनेश्वर कसबा, मिठगवाणे

✍️राजू सागवेकर /राजापूर

▪️ राजापूर तालुक्यातील बारा गावचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदेव अंजनेश्वर मंदिराचा वार्षिक महाशिवरात्र उत्सव यंदा माघ कृष्ण द्वादशी ते माघ अमावास्या, म्हणजेच मंगळवार, २५ फेब्रुवारी २०२५ ते गुरूवार, २७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत मोठ्या भक्तीभावाने साजरा होणार आहे.

▪️ या तीन दिवसांच्या उत्सवामध्ये पारंपरिक विधींप्रमाणे आरती, भोवती, कीर्तन आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहून आपल्या सहभागाने उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्रीदेव अंजनेश्वर कसबा, मिठगवाणेचे विश्वस्त डॉ. मिलिंद देसाई यांनी केले आहे.

▪️ तसेच, इच्छुक भक्तगणांनी यथाशक्ती देणगी प्रदान करून उत्सवाच्या यशस्वी आयोजनास हातभार लावावा, असेही त्यांनी नम्र आवाहन केले आहे.

Raju Sagvekar
Author: Raju Sagvekar

???? राजू सागवेकर ???? वार्ताहर (ग्रामीण ) - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र ता.राजापुर - 416702

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें