निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांचे वतीने आयोजित महारक्तदान शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद आप्पा कदम यांची ६५ व्या वर्षी रक्तदानाची शतक पूर्ती पुर्ण

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांचे वतीने आयोजित महारक्तदान शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद आप्पा कदम यांची ६५ व्या वर्षी रक्तदानाची शतक पूर्ती पुर्ण

निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांचे वतीने आयोजित महारक्तदान शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद आप्पा कदम यांची ६५ व्या वर्षी रक्तदानाची शतक पूर्ती पुर्ण

आबलोली (संदेश कदम)..गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आबलोली गावचे सुपूत्र आणि प्रगतशील शेतकरी सचिनशेठ कमलाकर कारेकर यांच्या गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली येथे महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष,निस्वार्थी समाज सेवक विद्याधर राजाराम कदम उर्फ आप्पा कदम यांच्या रक्तदान शतक पूर्तीचे औचित्य साधून प्रथम सत्रात आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबीराला आबलोली गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या महारक्तदान शिबीरात ५० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करुन आप्पा कदम यांच्या रक्तदानाच्या शतक पूर्तीला पाठिंबा दिला तर “जिवनदाता”,”आबलोली भूषण’ असे अनेक पुरस्कार प्राप्त आप्पा कदम यांनी आपल्या ६५ व्या वर्षी जन्मदानाचे औचित्य साधून १०० व्या वेळा रक्तदान करीत रक्तदानाची शतकपूर्ती साजरी केली.

यावेळी निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांचे वतीने रक्तदान करणा-या सर्व रक्तदाते यांचे सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक,
ग्रामपंचायत सदस्य यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन रक्तदान करणा-या रक्तदात्यांना निर्मल ग्रामपंचायत आबलोली व विजू आप्पा कदम मित्र परिवार यांचे तर्फे मान. आप्पा कदम यांचे “शतकपूर्ती रक्तदान” दिना निमित्त महारक्तदान शिबीर यशस्वी करण्यात आपण सहभागी होऊन “जिवन रक्षक” बनलात त्याबद्दल धन्यवाद “मान. आप्पा कदम यांनी १०० वेळा रक्तदान केले आहे.आपणही रक्तदान देऊन जीवनदान देवूया” असा मौलिक शुभ संदेश असणारे सन्मानचिन्ह तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय, रक्तकेंद्र रत्नागिरी यांचे सामायिक रक्तदान कार्ड,राज्यरक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य यांचे प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
या महारक्तदान शिबिराला आबलोली पंचक्रोशीतील तसेच गुहागर तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक,धार्मिक संघटनांच्या पदाधिकारी यांचेसह गुहागर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह भेट देऊन रक्तदात्यांचे आणि आप्पा कदम यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांच्या वतीने व सचिन कारेकर यांच्या गारवा कृषी पर्यटन केंद्राच्या वतीने पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित प्रत्येक वाडीप्रमूख,गावकरी, मानकरी, यांना निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांचे वतीने सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले या महारक्तदान शिबिराला रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालय रक्त केंद्र रत्नागिरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मोमीन नुजहत, डॉ. मोहम्मद मिसाळ, सागर चव्हाण, अधिपरिचारिक निरंजन चाफळे, जनसंपर्क अधिकारी श्रीमती. प्रणाली आयरे, अधिपरिचारिका कोमल पावसकर, संदीप पवार, संदिप बोडेकर यांनी हे रक्त संकलित केले .या प्रथम सत्रातील
महारक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी निर्मल ग्रामपंचायत आबलोली सरपंच सौ. वैष्णवी नेटके, ग्रामविकास अधिकारी बाबूराव सुर्यवंशी, उपसरपंच अक्षय पागडे, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, कर्मचारी,सर्व ग्रामस्थ तसेच आप्पा कदम मित्र मंडळ आणि सचिनशेठ कारेकर मित्र परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]