आबलोलीचे आप्पा कदम “रक्तदान रत्न” तर प्रगतशील शेतकरी सचिनशेठ कारेकर आबलोली भूषण”पुरस्काराने सन्मानित

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आबलोलीचे आप्पा कदम “रक्तदान रत्न” तर प्रगतशील शेतकरी सचिनशेठ कारेकर आबलोली भूषण”पुरस्काराने सन्मानित

आबलोलीचे आप्पा कदम “रक्तदान रत्न” तर प्रगतशील शेतकरी सचिनशेठ कारेकर आबलोली भूषण”पुरस्काराने सन्मानित

 

 निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांचा महारक्तदान शिबीर स्तुत्य उपक्रम

आबलोली (संदेश कदम) 

गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली, महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, निस्वार्थी समाज सेवक आणि आपल्या जीवनात रक्तदान हेच श्रेष्ठ दान मानून अनेकांना जिवदान देणारे “जिवनदाता “, “आबलोली भूषण” अशा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले अनेकांसाठी देवदूत ठरलेले आबलोली गावाचे नाव, गुहागर तालुक्याचे नाव, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उंच शिखरावर नेणारे आबलोली गावचे सुपूत्र विद्याधर राजाराम कदम उर्फ आप्पा कदम यांनी निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांनी आप्पा कदम यांच्या रक्तदान शतकपूर्तीसाठी आयोजित केलेल्या महारक्तदान शिबीरात ६५ व्या वर्षी १०० व्या वेळा रक्तदान करुन रक्तदानाची शतकपूर्ती साजरी केली याची दखल घेऊन निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांनी आप्पा कदम यांना “रक्तदान रत्न” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, गौरवण्यात आले 

                               तसेच गुहागर तालुक्यातील आबलोली गावचे सुपूत्र, गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोलीचे मालक आणि राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले प्रगतशिल शेतकरी सचिनशेठ कमलाकर कारेकर यांनी आबलोली गावचे नाव, गुहागर तालूक्याचे नाव, देशपातळीवर उच्च शिखरावर नेल्याबद्दल निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांनी सचिनशेठ कारेकर यांना “आबलोली भूषण” पुरस्काराने महारक्तदान शिबीरात दुपारच्या सत्रात गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली येथे गौरवण्यात आले सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.वैष्णवी नेटके या होत्या.आबलोलीच्या आप्पा कदम आणि सचिनशेठ कारेकर यांना हे दोन्हीं पुरस्कार पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, सरपंच वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी, उपसरपंच अक्षय पागडे यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले, गौरवण्यात आले यावेळी सत्काराला उत्तर देताना आप्पा कदम यांनी प्रत्येकाने परिश्रम, मेहनत करा. मी १०० वेळा रक्तदान केले आहे. रक्त दिल्याने कुणाला तरी जिवदान मिळते त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकवेळा रक्तदान करा रक्तदान केल्याने नुकसान होत नाही आपल्या शरीरात शुद्ध रक्त तयार होते.असा संदेश आप्पा कदम यांनी दिला तर सचिनशेठ कारेकर हे गावाच्या, घरच्या सत्काराने भाऊक होऊन त्यांनी गावाचे ऋण व्यक्त करुन शेती करा शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करा यश निश्चित मिळते शेती शिवाय तरणोपाय नाही असा संदेश सचिनशेठ कारेकर यांनी दिला. 

                            यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड, कृषी अधिकारी गजेंद्र पौणिकर, सरपंच सौ. वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी ,उपसरपंच अक्षय पागडे, सत्कार मुर्ती आप्पा कदम, सौ. विभावरी कदम, सचिनशेठ कारेकर, सौ.स्वरुपा कारेकर, माजी सरपंच सौ. श्रावणी पागडे,मंडळ अधिकारी आनंद काजरोळकर,आबलोलीचे ग्राममहसूल अधिकारी विनोद जोशी, आर. पी. आमचे गुहागर तालुका अध्यक्ष संदिप कदम,यशवंत पागडे, पोलिस पाटील महेश भाटकर,माजी सरपंच प्रमेय आर्यमाने, ग्रामपंचायत सदस्यां सौ. वृषाली वैद्य, सौ. शैला पालशेतकर,सौ.रुपाली कदम,सौ.पायल गोणबरे, श्रीमती. नम्रता निमूणकर, शरद साळवी आदी. मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाला आबलोली पंचक्रोशीतील विविध राजकीय पक्षाचे, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच आबलोली गावातील ग्रामस्थ शिक्षक बंधू- भगिनी, अंगणवाडी सेविका,कर्मचारी, गावकरी, वाडीप्रमूख, बहुसंख्येने उपस्थित होते. या सर्वांनी आप्पा कदम आणि सचिनशेठ कारेकर यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी यांनी केले तर सुत्रसंचालन सुहास गायकवाड यांनी केले हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी निर्मल ग्रामपंचायत आबलोली, ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी,सर्व ग्रामस्थ तसेच आप्पा कदम मित्र मंडळ आणि सचिनशेठ कारेकर मित्र परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के