आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न..

     देवरुख–  शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व ज्ञानदा गुरुकुल संस्था, पुणे यांच्यामार्फत महाविद्यालयात कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मान्यवरांच्या परिचयानंतर सर्वांचे कागदी पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. स्वागतानंतर प्रा. सीमा शेट्ये यांनी कार्यशाळेचा उद्देश व महत्त्व स्पष्ट केला.

     प्रशिक्षण कार्यक्रमात ज्ञानदा इन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पायपिंग टेक्नॉलॉजी या संस्थेचे संचालक मिलिंद डांगे यांनी विद्यार्थ्यांना करिअर घडवताना योग्य दिशा व मार्गदर्शनाची असलेली आवश्यकता स्पष्ट केली. त्यावेळी त्यांनी गुरुकुल पद्धतीचे महत्त्व, कौशल्याधारित प्लंबिंग प्रशिक्षण, बांधकाम क्षेत्रातील पायपिंगचे महत्त्व, आधुनिक काळातील प्लंबिंग क्षेत्रातील संधी. तसेच लौकिक शिक्षणाबरोबर कुशल कामगार घडवणे हे संस्थेचे ध्येय असल्याचे स्पष्ट केले. संस्थेचे मोबिलायझेशन ऑफिसर सोमनाथ कुलकर्णी यांनी आपल्या संस्थेतून प्रशिक्षित झालेल्या व स्वावलंबी, सन्मानाचे आयुष्य जगत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांची उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर ठेवली. पीपीटीच्या माध्यमातून यशस्वी विद्यार्थ्यांची यशोगाथाही प्रदर्शित केली.

     महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, रत्नागिरी यांच्यामार्फत बी.सी.ए. कॉलेजच्या प्राचार्या स्नेहा कोतवडेकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेतील विविध कोर्सेसची माहिती दिली. त्याचबरोबर या संस्थेच्या विविध शाखा, संस्थेचे उद्दिष्ट याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या समीना मुलानी, प्रा. केतन पाथरे आणि प्रा. प्रतिभा लोंढे यांनीही करिअर विषयक मार्गदर्शन केले.

        अध्यक्षीय समारोप करताना संस्थेच्या उपाध्यक्षा नेहा जोशी यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबी जीवनासाठी कौशल्याधारित प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने प्लंबिंगचे प्रशिक्षण सुरू केले जाणार असून विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्था उपाध्यक्षा सौ. जोशी यांनी याप्रसंगी केले. या प्रशिक्षणाचा लाभ इ. ११वी व १२वीच्या बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घेतला. या कार्यशाळेबाबत बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी नवीन शैक्षणिक धोरणात हस्तकला, कारागिरी, बांधकाम क्षेत्रातील विविध कौशल्य, तसेच डिजिटल कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्यासंदर्भात असलेल्या तरतुदी स्पष्ट केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, राहुल फाटक, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी आयोजकांचे कौतुक केले

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन