अभिमानास्पद !! राजापूरमध्ये धाडसी चिमुकल्याने सहा वर्षांच्या मुलाला पाण्यातून वाचवले.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अभिमानास्पद !! राजापूरमध्ये धाडसी चिमुकल्याने सहा वर्षांच्या मुलाला पाण्यातून वाचवले.

 

✍️राजू सागवेकर/राजापूर 

 

▪️ राजापूर तालुक्यातील एका रिसॉर्टमध्ये घडलेल्या धाडसी घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राजापूर बार असोसिएशनच्या 6 व्या फॅमिली गॅदरिंग दरम्यान एका सहा वर्षांच्या मुलाला पाण्यात पडल्यानंतर आठ वर्षांच्या धाडसी मुलाने त्याला वाचवले. या धाडसी चिमुकल्याचे नाव नील सुशांत पवार असून तो वरचीपेठ, राजापूर येथे राहतो.

 

▪️ घटनेचा वृतांत असा की, राजापूर बार असोसिएशनचे 6 वे फॅमिली गॅदरिंग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका रिसॉर्टमध्ये 26 जानेवारी रोजी पार पडले. या कार्यक्रमासाठी राजापूर तालुक्यातील वकील आणि त्यांची कुटुंबे रिसॉर्टमध्ये उपस्थित होती. सायंकाळी कार्यक्रम सुरू असताना मुलांनी स्वीमिंग पूलाजवळ खेळायला सुरुवात केली. त्यापैकी ऍड. अभिषेक ढवळे यांचा सहा वर्षांचा मुलगा रूद्र आणि ऍड. सुशांत पवार यांचा आठ वर्षांचा मुलगा नील स्वीमिंग पूलाजवळ खेळत होते.

 

▪️ अचानक रूद्रचा तोल गेला आणि तो स्वीमिंग पूलात पडला. पूलात सुमारे पाच ते सहा फुट खोल पाणी होते, त्यामुळे रूद्र पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. या क्षणी नीलने काहीही विचार न करता रूद्रला हात दिला आणि त्याला पाण्याबाहेर खेचले. या घटनेच्या वेळी त्या ठिकाणी रूद्र आणि नील या दोघांव्यतिरिक्त कोणीही नव्हते.

 

▪️ रूद्रच्या आई-वडिलांनी नीलच्या धाडसाचे कौतुक करताना म्हटले, “नील आमच्यासाठी एखाद्या देवदुताप्रमाणे धावून आला. त्याच्या वयाचा विचार करता तो घाबरून पळून गेला असता, पण त्याने धैर्य दाखवून आमच्या मुलाला वाचवले.”

 

नील सुशांत पवार हा वरचीपेठ येथील शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहे. त्याच्या या शौर्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. राजापूर तालुक्यातील लोक त्याला ‘सुपर हिरो’ म्हणून गौरवत आहेत.

अभिमानास्पद !! राजापूरमध्ये धाडसी चिमुकल्याने सहा वर्षांच्या मुलाला पाण्यातून वाचवले.

▪️ या घटनेने सर्वांना हेच सांगितले आहे की, धैर्य आणि समयसूचकता म्हणजेच जीवन वाचवण्याची गुरुकिल्ली. नीलच्या या धाडसी कृत्यामुळे त्याच्या कुटुंबासह संपूर्ण राजापूर तालुका अभिमानाने सद्गदित झाला आहे.

अभिमानास्पद !! राजापूरमध्ये धाडसी चिमुकल्याने सहा वर्षांच्या मुलाला पाण्यातून वाचवले.

 

Raju Sagvekar
Author: Raju Sagvekar

???? राजू सागवेकर ???? वार्ताहर (ग्रामीण ) - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र ता.राजापुर - 416702

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]