मी जनसेवक म्हणून कामं करणार, जनतेच्या पैशाचा अवमान होणार नाही!. —पालकमंत्री नितेश राणे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मी जनसेवक म्हणून कामं करणार, जनतेच्या पैशाचा अवमान होणार नाही!.
—पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन.

जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही,आर्थिक शिस्तीला प्राधान्य देणार!
चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शाबासकी मिळेल!,

मात्र भ्रष्टाचारांवर कारवाई करणार!

सिंधुदुर्गात प्राणी संग्रहालय उभे करू—सिंधुदुर्गचे पालकमंत्री मंत्री नितेश राणे.

सिंधुदुर्गनगरी :— भ्रष्टाचार व चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला कारवाईला सामोरे जावे लागेल.

प्रशासनात आर्थिक शिस्त आणली जाईल, चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याला शाबासकीची थाप मिळेल, जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च झाला पाहिजे व जनतेच्या या पैशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. जिल्ह्याचा विकास व जनतेची कामे एक सेवक म्हणून मी करेन व अधिकाऱ्यांकडून करून घेईन. जनतेचे राहणीमान व दरडोई उत्पन्न वाढेल असे काम आपल्या कृतीतून दिसेल व हत्ती व वन्यप्राणी उपद्रव टाळण्यासाठी जिल्ह्यात प्राणी संग्रहालय करू असे राजाचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

कणकवली येथील बांगलादेशी महिलांना झालेली अटक ही रेल्वे स्टेशनवर दाखविण्यात आली मात्र ती संबंधित लॉजवर प्रत्यक्षात झाली होती.
ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी पाच लाखाची ऑफर तीन लाखाच्या तोडपाणीवर नोंद बदलून रेल्वे स्टेशनवर दाखविली त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होईल.

बांगलादेशी नागरिक रोहिंगे यांच्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गंभीर दखल घेत असताना पोलिसांनी केलेले धाडस गंभीर आहे.
म्हणूनच पोलीस महानिरीक्षकांमार्फत याची चौकशी आपण सुरू केली आहे. त्यामुळे कणकवलीतील तीन पोलीस अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई होईल असेही मंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्ती व वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे याबाबत बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले या जिल्ह्यात प्राणीसंग्रहालयाचा एक विचार सुरू आहे. त्याशिवाय उद्योगपती आनंद अंबानी यांच्याशी आपली चर्चा झाली आहे.

मी जनसेवक म्हणून कामं करणार, जनतेच्या पैशाचा अवमान होणार नाही!.
—पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन.

जामनगर येथील वनतारा प्रकल्पात या भागातील हत्ती किंवा उपद्रव करणारे वन्य प्राणी सोडता येतील का याचाही विचार सुरू आहे. बारामती येथील बिबटे या प्रकल्पात सोडण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा केली आहे.

त्याचप्रमाणे या जिल्ह्यातील हत्ती त्या ठिकाणी सोडता येतील का याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांची एक टीम आपल्या संपर्कात आहे असेही ते म्हणाले.

मी जनसेवक म्हणून कामं करणार, जनतेच्या पैशाचा अवमान होणार नाही!.
—पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

प्रा. जहूर बोट 'सर्वोत्तम विद्यार्थी' पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश शृंगारतळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न; समृद्धीवर...
Read More
प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रविवारी रात्री झालेल्या आयपीएल...
Read More
वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग