■ सरपंच अभ्यास दौरा थंड हवेच्या ठिकाणी
रत्नागिरी पंचायत समितीची थंड हवेच्या ठिकाणची सरकारी सहल!!आर्थिक तरतूद खाजगी वाल्याकडून!!
◆ सरपंच होणार कुल कुल,
सिमला,कुल्लू मनाली, हिमाचल प्रदेश मध्ये करणार अभ्यास.
◆ तालुक्यातील ५० सरपंचा दौरा असताना प्रत्यक्ष घेतले ४८ त्यात घुसवले खाजगी दोन लोक!!
◆ समिर शिरवडकर-रत्नागिरी.
रत्नागिरी ( रत्नागिरी) :- रत्नागिरी पंचायत समिती चा ठंडा ठंडा कुल कुल दौरा!! ७ लाख रुपये पंचायत समितीचे अनुदान आणि बाकीचे पैसे स्पॉन्सर शीप घेऊन हा सहल रुपी अभ्यास दौरा असून,स्पॉन्सर शीप चे पैसे कोणी व कसे दिले. सरकारी कामकाजात खाजगी पैसे घेतात का? असा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित होत आहे.
रत्नागिरी तालुक्यात ९४ ग्रामपंचायती असून त्यातील १५ ग्रामपंचायतीवर प्रशासक आहेत.
मग एवढे ग्रामपंचायतीचे सरपंच असताना ५० च का? आणि या दौऱ्यात दोन खाजगी लोकांना कसे घेतले त्याचा खर्च कोण करणार अस देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
रत्नागिरी पंचायत समिती ची ही सरपंचाची हिवाळी सहल कुल्लू मनाली, सिमला, हिमाचल प्रदेश या ८ दिवसासाठी दौऱ्यावर गेली असून,
पंचायत समिती सेस फंड मधून ७ लाखाची उधळपट्टी केली जाणार आहे.नाव सरपंचाचा अभ्यास दौरा पण दौऱ्यात दोन पत्रकार
अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली हिमाचल प्रदेश,कुलूमनाली आणि पंजाब मध्ये पर्यटन दरम्यान या दौऱ्या बाबत जिल्हा परिषदे च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कसलीच कल्पना नसल्याचे समजते.