बळीराज सेना युवा नेते ॲड.विनेश वालम यांचा कोकण दौरा यशस्वी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बळीराज सेना युवा नेते ॲड.विनेश वालम यांचा कोकण दौरा यशस्वी

*बळीराज सेना युवा नेते ॲड.विनेश वालम यांचा कोकण दौरा यशस्वी*

युवकांना व्यवसायात उतरण्याचे केले आवाहन

आबलोली (संदेश कदम)

कोकणातील युवकांनी मुंबई पुण्यासारख्या शहरात न जाता आता आपल्या गावातच राहून बिन व्याजी कर्ज योजनेतून कोणता ना कोणता उद्योग व्यवसाय करावा लागेल. तरुणांनी आता आपल्या हक्काच्या व्यवसायात उतरले पाहिजे असे आवाहन कोकण दौऱ्यावर आलेल्या बळीराज सेनेचे युवा नेते ॲड.विनेश वालम यांनी केले आहे.
नियोजना नुसार दिनांक ८ ते १० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ॲड.वालम यांनी चिपळूण गुहागर व खेड तालुक्यात मोठया जल्लोष्यात आपला संपर्क दौरा केला. यावेळी जिल्हा अध्यक्ष श्री.पराग कांबळे, गुहागर विधानसभा संपर्क प्रमुख श्री.शरद बोबले, श्री.मनोहर पवार, श्री.सचिन खाड्ये, श्री.अमित बोबले यांचेसह चिपळूण तालुका संपर्क प्रमुख श्री.चंद्रकांत कोकमकर, गुहागर विधानसभा सहसंपर्क प्रमुख श्री.संतोष निवाते, श्रीप्रशांत भेकरे गुहागर तालुका अध्यक्ष श्री.अरुण भुवड, सचिव ॲड.दिनेश कदम, श्री.संतोष पास्टे, श्री.सुनील वाघे, श्री.विनायक घाणेकर, श्री.विजय शिगवण, श्री.चंद्रकांत साळवी, श्री.रामकृष्ण महाडिक यांसह अनेक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थितीत होते.
या दौऱ्यावर असताना ॲड. विनेश वालम यांनी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

बळीराज सेना युवा नेते ॲड.विनेश वालम यांचा कोकण दौरा यशस्वी

[post-views]

Leave a Comment

आणखी वाचा...