आमदार किरण सामंत यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आमदार किरण सामंत यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा

banner

 

✍️राजू सागवेकर/राजापूर 

 

▪️ राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन आणि पुलांच्या विकासासाठी आमदार किरण सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गांच्या भूसंपादनातील अडचणी आणि विविध समस्या यावर सखोल चर्चा करण्यात आली.

 

*भूसंपादनाच्या तातडीच्या समस्यांचे निराकरण*

 

▪️ या चर्चेदरम्यान राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन करताना येणाऱ्या अडचणी आणि लोकांच्या समस्या त्वरित सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. महामार्ग विकासात येणाऱ्या तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी दूर करून लोकांना न्याय मिळवून देऊ, असेही त्यांनी नमूद केले.

 

*शासकीय नादुरुस्त वाहनांचा लिलाव करण्याची विनंती*

 

यावेळी आमदार किरण सामंत यांनी शासकीय विभागांमध्ये नादुरुस्त गाड्या वर्षानुवर्षे पडून असल्याने परिसर अस्वच्छ होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. या गाड्यांचा लिलाव किंवा स्क्रॅपमध्ये समावेश करून त्या जागा मोकळ्या करण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.

 

*सीआरएफ निधीतून पुलांना मंजुरी*

 

▪️ मतदारसंघातील हर्चे बेनगी, कोलघे कांटे आणि विलये गोवळ येथील पुलांचे बांधकाम केंद्रीय रस्ते निधी (CRF) अंतर्गत करण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी आमदार सामंत यांनी केली. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ही मागणी तत्काळ मंजूर केली, यामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

रत्नागिरीसाठी इलेक्ट्रिक मिनीबसची मागणी

 

▪️ याशिवाय, रत्नागिरी शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी इलेक्ट्रिक मिनीबस उपलब्ध करून देण्याची मागणी देखील आमदार किरण सामंत यांनी केली. यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आश्वासन दिले.

 

▪️ आमदार किरण सामंत यांनी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. त्यांच्या या भेटीमुळे मतदारसंघातील विकास कामांना मोठा वेग मिळण्याची शक्यता आहे.

आमदार किरण सामंत यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा

Raju Sagvekar
Author: Raju Sagvekar

🔴 राजू सागवेकर 🔴 वार्ताहर (ग्रामीण ) - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र ता.राजापुर - 416702

Leave a Comment

आणखी वाचा...