आंबेटेंभे येथे माता भिमाई जयंती महोत्सवाचे आयोजन
नवी मुंबई (मंगेश जाधव)
सालाबाद प्रमाणे दि बुध्दिस्ट कल्चरल ट्रस्ट (रजि.) यांच्या विद्यमाने बुधवार दिनांक १२ फेब्रुवारी२०२५ रोजी माघी पौणिमेस विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आई माता भिमाई यांची १७१ वी जयंती त्यांच्या जन्मगावी मौजे आंबेटेंभे (जेतवर) ता. मुरबाड, जि. ठाणे येथे साजरी होत आहे.
यावेळी पुज्य भदन्त शांतीरत्न, पुज्य भदन्त अशोक हे बुध्द वंदना व सुत्र पठण करतील.सदरवेळी प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी लोकसभाचे खासदार सुरेश म्हात्रे, मुरबाड विधानसभा मतदार संघाचे आमदार किसनजी कथोरे, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाण्याचे पोलिस अधिक्षक डॉ. डी.एस. स्वामी आदी मान्यवर उपस्थित राहतील.
या कार्यक्रमाच्या सभाध्यक्षा प्रियाताई खरे असून स्वागताध्यक्ष प्रमोद अणि रमेश जाधव असणार आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिमन्यू भालेराव आणि डॉ. वृषाली खरे हे करणार आहेत.तसेच सद्धम्म पत्रिकाचे संपादक प्रा. आनंद देवडेकर हे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ साहित्यिका उर्मिला पवार, जेष्ठ समाजसेवक गौतम बस्ते, जेष्ठ समाज सेवक सिकंदर वाघमारे, जेष्ठ समाज सेविका शोभा मावळे, वा. प्रा. सोमय्या महाविद्यालयाच्या वा. प्रिन्सीपल संदीप भालेराव, जेष्ठ समाज सेविका मिनाताई साळवे, जेष्ठ समाज सेवक राजेश घनगाव आणि जेष्ठ समाज सेवक बंदेश सोनवणे यांना भिमाई पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे संयोजक डॉ. स्मिता खरे, विवेक साळवी, दिनेश उघडे, अशो पंडित, राजेश खरे, संगिता जाधव आणि सुहास सावंत हे असून सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विंनती एका पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.