बळीराज सेनेचे २३ फेब्रुवारी रोजी गुहागर मध्ये व्यावसायिक कौशल्य विकास मार्गदर्शन शिबीर
पक्षप्रमुख वालम यांचे हस्ते होणार तालुका जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ
आबलोली (संदेश कदम) …..
बळीराज सेनेचे युवा नेते विनेश वालम यांचा कोकण दौरा मोठया जनजागृती मध्ये पार पडल्या नंतर आता पक्षप्रमुख अशोकदादा वालम रविवारी दि.२३ फेब्रुवारी २०२५ रोजी गुहागर मध्ये एका मोठया मेळाव्यासाठी दाखल होणार आहेत. गुहागर तालुका बळीराज सेना जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ पक्षप्रमुख अशोकदादा वालम यांचे शुभहस्ते शृंगारतळी येथे पार पडल्या नंतर त्यांचेच अध्यक्षते खाली बळीराज सेना आयोजित व्यावसायिक कौशल्य विकास मार्गदर्शक मेळावा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याच बरोबर महिलांसाठी हळदीकुंकू व पैठणी कार्यक्रम होणार आहे.
सदर मेळाव्याला तमाम नागरिकांनी व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे, विधानसभा संपर्क प्रमुख शरद बोबले, तालुका अध्यक्ष अरुण भुवड व सचिव ॲड.दिनेश कदम यांनी केले आहे.
दरम्यान बळीराज सेनेच्या या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक अशोकदादा वालम तसेच व्यावसायिक मार्गदर्शन करण्यासाठी लोकनेते शामराव पेजे कोकण आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.प्रकाश भांगरथ, पक्षाचे नेते सुरेश भायजे, प्रकाश तरळ, नंदकुमार मोहिते, संभाजी काजरेकर, युवा नेते ॲड.विनेश वालम , पाटपन्हाळे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच विजय अर्जुन तेलगडे व अन्य निमंत्रिक मान्यवर उपस्थितीत रहाणार आहेत.
सदरचा कार्यकम हा पालपेणे फाटा येथील भवानी सभागृह (मंगळकर्यालय) जानवले, ता.गुहागर जि.रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. सकाळी १०:०० वाजल्या पासून या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी गुहागर विधानसभा मतदार संघ संपर्क प्रमुख शरद बोबले यांच्या मार्गदर्शन खाली सुरु आहे. यामुळे बळीराज सेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मध्ये उत्साह पसरला आहे.
बळीराज सेनेचे २३ फेब्रुवारी रोजी गुहागर मध्ये व्यावसायिक कौशल्य विकास मार्गदर्शन शिबीर