महिलांना आणि तरुणांना शेती व्यवसायातून आर्थिक सक्षम करणार – अशोकदादा वालम
शृंगारतळी येथे बळीराज सेना जनसंपर्क कार्यालयाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोकदादा वालम यांचेहस्ते उदघाटन संपन्न
आबलोली (संदेश कदम)
आज गुहागर मध्ये बळीराज सेनेचा आगळा वेगळा मेळावा होतोय. गेले २२ महिने आपण बळीराज सेनेच्या माध्यमातून विविध विकास कामे करतोय आणि कमी वेळात आपल्या पक्षाने बरेच यश संपादन केले आहे महत्त्वाचे म्हणजे आज आज आपण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे बळीराज सेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन केले आहे. या कार्यालयातून आमचे पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते गुहागर तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविणार असून जमिन जाग्याचा प्रश्न, बेदखल कुळांचा प्रश्न मार्गी लावणार असून बेरोजगारी आणि उद्योग धंदे व्यवसाय यावर आंम्ही लक्ष केंद्रित केले असून या गुहागर तालुक्यात लोक शेती करत नाहीत कारण त्यांना शेतीतून हवा तसा मोबदला मिळत नाही, फायदा होत नाही इथला तरुण मुंबई, पुणे, ठाणे येथे मोठ्या शहरात नोक-या करायला जातात.पण सगळीकडे खाजगीकरण होतेय. म्हणून शेती आणि त्याचबरोबर जोडधंदा यावर जास्त भर देणार असून गुहागर तालुक्यातील महिला आणि तरुणांना शेती व्यवसाय उद्योग धंद्यातून आर्थिक सक्षम करणार असा ठाम विश्वास बळीराज सेना या राजकीय पक्षाचे पक्ष प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष अशोकदादा वालम यांनी व्यक्त केला
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील पालपेणे फाटा येथील स्टार प्लाझा बिल्डिंग मध्ये गुहागर तालुका बळीराज सेना जनसंपर्क सुसज्ज कार्यालयाचे उदघाटन पक्ष प्रमुख, राष्ट्रीय अध्यक्ष अशोकदादा वालम यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. यावेळी पक्ष प्रमुख, राष्ट्रीय अध्यक्ष अशोकदादा वालम हे पत्रकारांशी बोलत होते
अशोकदादा वालम पुढे म्हणाले की, शासनाच्या शेतक-यांसाठी विवीध योजना आहेत त्या योजना आमच्या बळीराज सेना पक्षाच्या मार्फत पदाधिकारी हे शेतक-यांपर्यंत घेऊन जाणार आहेत. आणि ख-या अर्थाने नोक-यांवर अवलंबून राहिलो तर आपलं आपल्या मुलाचं भवितव्य धोक्यात येईल यासाठी शेती आणि त्यासोबत जोडधंदा, व्यवसायातून आर्थिक सक्षम कसे होऊ शकतो ते पटवून देणार आहेत. जे रोजगार, छोटे मोठे व्यावसायिक आहेत किंवा ज्यांना नविन व्यवसाय करायचा आहे अशांना शामराव पेजे कोकण इतर आर्थिक विकास महामंडळ यांचेकडून बिनव्याजी कर्जाची योजना राबविणार आहोत
असे सांगून पक्ष प्रमुख अशोकदादा वालम पुढे म्हणाले की,जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख पराग कांबळे आहेत, तालुका प्रमुख यांचे सोबत आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते या जनसंपर्क कार्यालयात जनतेच्या सेवेसाठी राहणारच आहेत पण आंम्ही जिथे जिथे तालुक्यांमधून जनसंपर्क कार्यालये चालू करतोय तिथे तिथे मुंबईची सेंटर कमिटी त्याच्यावरती डायरेक्ट लक्ष ठेवून आढावा घेणार आहे या जनसंपर्क कार्यालयात जनतेच्या सेवेसाठी बसणा-या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या नेमणूका करण्यात येणार असून कुठल्या विषयावर कुठल्या समस्येवर कोण मार्गदर्शन करेल, उदा: कृषी चा विषय असेल, जमिनींचा विषय असेल बेदखल कुळांचा प्रश्न असेल तर या प्रत्येक विषयांसाठी दोन दोन व्यक्ती त्या त्या वेळेत मार्गदर्शन करतील आणि याविषयी कार्यालया बाहेर बोर्ड लावण्यात येईल त्यामुळे जनतेचा वेळ वाचेल, टाईम टेबल प्रमाणे काम चालेल प्रत्येक डिपार्टमेंटच्या संबंधित असलेले आपले पदाधिकारी हे एक्सपर्ट असतील २ – ४ दिवसात तशी लिस्ट नोटिस बोर्डावर लावली जाईल ईथे कार्यालय प्रमुख कोण असेल कार्यालय किती वाजल्यापासून उघडेल आणि किती वाजता बंद होईल याचे नियोजन केले जाईल अशी माहिती पक्ष प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष अशोकदादा वालम यांनी दिली
या तालुक्यात अनेक समाजातील अनेक समस्या आहेत त्या सर्वांसाठी हे कार्यालय असेल की, बळीराज सेनेसाठी असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच अशोकदादा वालम म्हणाले की,आमच्या पक्षाची स्थापना करण्यात आली तेव्हाच आमच्या पक्षाची घटना तयार करण्यात आली. आणि या घटने नुसार हा बळीराज सेना पक्ष म्हणजे बळीराजा, बळीराजा म्हणजे शेतकरी हा पक्ष शेतक-यांचा आहे या आमच्या पक्षात शेतकरी आले, शेतमजूर आले, कष्टकरी आले, बहूजन आले, कामगार वर्ग आला या सर्वांसाठी, सर्व जाती धर्मांसाठी, जाती धर्माच्या लोकांसाठी असलेल्या समस्या आहेत त्या सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी इथून प्रयत्न केला जाणार आहे यासाठीच हे कार्यालय उघडण्यात आल्याचे अशोकदादा वालम यांनी जाहीर केले
आपण राजकीय पक्षाच्या वतीने गुहागर तालुक्यात आगामी जि. प. पंचायत समिती निवणूक स्वतंत्र लढणार की कसे काय? याबाबत आपली भूमिका काय असा प्रश्न विचारताच अशोकदादा वालम म्हणाले की, आपण राजकीय पक्ष स्थापन करतो तेव्हां निवडणुकांमध्ये सहभाग हा घ्यावाच लागतो आणि आंम्ही सहभाग हा घेणारच गेल्या विधानसभा निवडणुकीत राजेश बेंडल यांना आपण उमेदवारी दिली.उमेदवारी दिली म्हणजे दुसऱ्या पक्षाला दिली गेलेली उमेदवारी जसे सिंहाच्या जबड्यातून हात घालून घास काढून आणणे तशा पध्दतीने त्यांना तिकीट आणून दिले याचाच अर्थ आंम्ही राजकारणात पाय ठेवलाच आहे येणाऱ्या जि. प. व पं. स. निवडणूकीत आणि ग्रामपंचायत निवडणुकींना बळीराज सेना सामोरे जाणार आणि आंम्ही लढणार असा विश्वास व्यक्त करताना आंम्हाला महायुती कींवा महाविकास आघाडीने कुणीही आंम्हाला सन्मान पुर्वक जागा न दिल्यास आंम्ही स्वतंत्र लढू पण तो निर्णय चर्चेअंती सोडवू असा विश्वास ही अशोकदादा वालम यांनी व्यक्त केला यावेळी शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश भांगरथ, पक्षाचे उपाध्यक्ष सुरेश भायजे,चंद्रकांत कोकमकर, सरचिटणीस प्रकाश तरळ नंदकुमार मोहिते, संभाजी काजरेकर, जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे, उपाध्यक्ष सखाराम माळी, विधानसभा अध्यक्ष शरद बोबले, सह.संपर्क प्रमुख संतोष निवाते, मनोहर घुमे, अमित काताळे, प्रशांत भेकरे, तालुका अध्यक्ष अरुण भूवड तालुका सचिव ॲड. दिनेश कदम आदी.पदाधिकरी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या बहुसंख्येने उपस्थित होत्या.