शृंगारतळी येथील राजलक्ष्मी चित्रमंदिर येथे “छावा” चित्रपट येत्या पाच दिवसात संबंधित मालकाने प्रदर्शित न केल्यास मनसे आक्रमक पावित्रा घेणार – विनोद जानवळकर यांचा इशारा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शृंगारतळी येथील राजलक्ष्मी चित्रमंदिर येथे “छावा” चित्रपट येत्या पाच दिवसात संबंधित मालकाने प्रदर्शित न केल्यास मनसे आक्रमक पावित्रा घेणार – विनोद जानवळकर यांचा इशारा

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील राजलक्ष्मी चित्रमंदिर येथे “छावा” चित्रपट येत्या पाच दिवसात संबंधित मालकाने प्रदर्शित न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका गुहागर या पक्षा तर्फेआक्रमक पावित्रा घेणार असल्याचे निवेदन गुहागर तहसीलदार परीक्षित पाटील यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की, गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील वेळंब रोड येथे राजलक्ष्मी चित्रमंदिर आहे. परंतु मालकाच्या काही कारणास्तव ते सध्या बंद अवस्थेत आहे. गुहागर तालुक्यात एकच सुसज्ज करमणूक केंद्र म्हणून राजलक्ष्मी चित्रमंदिर आहे. परंतु हे चित्रमंदिर बंद असल्याने गुहागर तालुका वासियांना करमणुकीपासून वंचित राहावे लागत आहे. सध्या संपूर्ण भारत देशभर गाजत असलेला श्री. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट सर्वत्र प्रदर्षित आहे. परंतु या चित्रपटाचा लाभ गुहागर तालुका वासिय घेऊ शकत नाहीत. याबाबत राजलक्ष्मी चित्रमंदिर व्यवस्थापनाला विचारणा केली असता, सदर चित्रपट प्रदर्शित करण्यास मालकाने नकार दिला आहे. या छावा चित्रपटांमध्ये चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथील अभिनव साळुंखे हा छोटा कलाकार छत्रपती संभाजी राजे भोसले यांची बाल वयातील भूमिका आहे. हे आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने गौरवास्पद आहे. या बाल कलाकाराचा मनसेच्या वतीने सन्मान करण्याचं भाग्य ही आम्हाला लाभले आहे. सर्वत्र प्रदर्शित होत असलेला ‘छावा’ चित्रपटाचे काही शो मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष .प्रमोद गांधी साहेब यांच्या सौजन्याने गुहागर वासियांसाठी मोफत लावण्याचे योजले आहे. याबाबत आम्ही व्यवस्थापनास याची माहिती दिली, तरीही चित्रपट प्रदर्शित करण्यास त्यांनी दुर्लक्ष केले आहे. येत्या पाच दिवसात राजलक्ष्मी चित्रमंदिर मध्ये ‘छावा’ चित्रपट राजलक्ष्मी चित्रमंदिर च्या मालकाने प्रदर्शित न केल्यास मनसे आक्रमक पवित्रा घेईल याची नोंद घ्यावी. या निवेदनाच्या प्रती १)गुहागर पोलीस स्टेशन, करमणूक कार्यालय, रत्नागिरी, २)उपविभागीय कार्यालय, चिपळूण, ३)जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी,

४)राजलक्ष्मी चित्रमंदिर व्यवस्थापन, शृंगारतळी, गुहागर यांना देण्यात येणार आहेत.यावेळी उपजिल्हा अध्यक्ष श्री विनोद गणेश जानवळकर,उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी, अमित खांडेकर, शहर अध्यक्ष नवनाथ साखरकर, विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे,शहर सचिव अभिजित रायकर, प्रशांत साटले दत्ताराम गिजे महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के