गुहागर तालुक्यातील शिवराय मावळे प्रतिष्ठान आबलोली यांच्या वतीने आबलोलीत शिवजन्मोत्सव सोहळा..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर तालुक्यातील शिवराय मावळे प्रतिष्ठान आबलोली यांच्या वतीने आबलोलीत शिवजन्मोत्सव सोहळा

विविध कार्यक्रमांनी,विवीध स्पर्धांनी उत्साहात साजरा – छावा चित्रपटातील बाळ संभाजी महाराजांची भुमिका साकारणारा कलाकार अभिनव सचिन साळुंखे याची प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन

आबलोली(संदेश कदम)  

गुहागर तालुक्यातील आबलोली येथील शिवराय मावळे प्रतिष्ठान आबलोली यांचे संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त “शिवजन्मोत्सव २०२५” हा सोहळा जल्लोषात आणि उत्साहात विविध कार्यक्रमांनी, विविध स्पर्धांनी उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी आबलोली बाजारपेठेतून पांचाळवाडी आबलोली येथे कार्यक्रम स्थळी शिवस्मारकाची मिरवणूक (बाईक रॅली) काढण्यात आली. या रॅलीसाठी छावा चित्रपटातील बाळ संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा कलाकार अभिनव सचिन साळुंखे याची प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले.यावेळी मनसेचे गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, अध्यक्ष रमेश पांचाळ, उपाध्यक्ष संजय पांचाळ, सरपंच वैष्णवी नेटके, ग्रामसेवक सूर्यवंशी, अल्पिता पवार, श्रावणी पागडे, आशिष भोसले, गणपत पांचाळ, संदेश सावंत सर, लोणारे सर, साळवे सर, लवटे सर, बचुटे सर, मुग्धा पागडे यांचेसह ग्रामस्थ मंडळी या रॅलीत बहुसंख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य मर्यादित निबंध स्पर्धेत ३०० स्पर्धकांना प्रवेश मर्यादित असताना यामध्ये प्रथम क्रमांक ५०००/- रु. विजेता विशाल भोसले, (रायगड), द्वितीय क्रमांक ३०००/- रु. विजेता जितेंद्र मयेकर (रत्नागिरी) आणि तृतीय क्रमांक १०००/- रु. विजेता दिवाकर बडगुजर (जळगांव) ठरले. प्रत्येकाला ट्रॉफी, मेडल आणि रोख रक्कम देण्यात आली. सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.जिल्हा परिषद शाळा मर्यादित वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा आबलोली नं. १ ची विद्यार्थिनी श्रेया शिवाजी साळवे रोख रक्कम ५००/- रु., ट्रॉफी व गोल्ड मेडल, द्वितीय क्रमांक जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा आबलोली नं. १ चा विद्यार्थी रोहन दादासाहेब बचुटे रोख रक्कम ३००/- ट्रॉफी व सिल्व्हर मेडल, तृतीय क्रमांक जि.प. प्राथमिक शाळा आबलोली पागडेवाडी नं. २ चा विद्यार्थी ओम प्रशांत नेटके ठरला. सहभागी सर्व स्पर्धकांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.रेकॉर्ड डान्स स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक ६००/- रु., ट्रॉफी व मेडल विजेते जिल्हा परिषद शाळा आबलोली पागडेवाडी नं.२ च्या मुलांनी सादर केलेला छत्रपती शिवाजी महाराज जिवंत जन्म देखावा ठरला. द्वितीय क्रमांक ४००/- रु. ट्रॉफी व सिल्व्हर मेडल विजेता कोळी नृत्य मी ढोळकर दर्याचा राजा जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा आबलोली नं. १ ची विद्यार्थी ठरले. तृतीय क्रमांक २००/- रु. व मेडल्स जिल्हा परिषद आदर्श शाळा खोडदे शाळेचे विद्यार्थी ठरले. मोठा गट प्रथम क्रमांक १०००/- रु. ट्रॉफी, गोल्ड मेडल विजेता माध्यमिक विद्यालय कोळवली शाळेच्या विद्यार्थिनी दिक्षा व सोनाली डिंगणकर माझ्या शिवबाचे नाव रे गीतावर ठरल्या. द्वितीय क्रमांक ७००/- रु. ट्रॉफी व सिल्व्हर मेडल विजेता माध्यमिक विद्यालय आबलोली शाळेतील अक्षरा सावंत हिने हालगी वाजती गाण्यावर पटकावले. तर तृतीय क्रमांक ३००/- रु. ट्रॉफी, कास्य मेडल असावरी पांचाळ आई तुळजाभवानी गीतावर हिने पटकावले. खुला गटात प्रथम क्रमांक १५००/- रु. ट्रॉफी, गोल्ड मेडल विजेता न्यू इंग्लिश स्कूल पाचाड गणेशखिंड विद्यालयाची विद्यार्थिनी पायल कोतवडेकर, आईचा जोगवा या गीतावर विजेता ठरली. तर द्वितीय क्रमांक १०००/- ट्रॉफी, सिल्व्हर मेडल विजेता आबलोली पागडेवाडीतून हितिका पागडे एक दंताय वक्रतुंडाय या गीतावर विजेता ठरली. या स्पर्धांचे पर्यवेक्षण गणपत पांचाळ, वासुदेव पांचाळ, अविनाश उपरीकर, शुभम पांचाळ, संदेश सावंत शिवाजी साळवे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष नितेश पांचाळ यांनी केले. तर प्रथमेश पांचाळ याने सर्वांचे आभार मानले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के