मनसे गुहागर तालुका पक्षाच्या वतीने गुहागर तालुका ज्ञान रश्मी वाचनालयाला पुस्तकांची भेट

मनसे गुहागर तालुका पक्षाच्या वतीने गुहागर तालुका ज्ञान रश्मी वाचनालयाला पुस्तकांची भेट

आबलोली (संदेश कदम) 

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर या राजकीय पक्षाच्या वतीने व उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या सौजन्याने गुहागर शहरातील सुसज्ज अशा गुहागर तालुका ज्ञानरश्मी वाचनालयास पुस्तके भेट देण्यात आली. याप्रसंगी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांच्याकडे पुस्तके सुपूर्द केली.

या पुस्तके वितरण कार्यक्रमाला गुहागर तालुका ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर , मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर,तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, उप तालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी, प्रशांत साटले यांच्यासह दत्तात्रय गुरव, मनाली बावधनकर, प्रभुनाथ उर्फ बाबाशेठ देवळेकर, गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, खातू,अरुणा पाटील , पत्रकार गणेश किर्वे आणि महाराष्ट्र सैनिक हजर होते. यावेळी ज्ञानरश्मी वाचनालयातर्फे मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वाचनालयाला पुस्तक भेट दिल्याने मनसेचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी आभार व्यक्त करण्यात आले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें