श्री सनगरेवाडी सार्वजनिक मंडळ आयोजित सनगरेवाडी चषक २०२५ उत्साहात संपन्न.

श्री सनगरेवाडी सार्वजनिक मंडळ आयोजित सनगरेवाडी चषक २०२५ उत्साहात संपन्न..

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रायोजकांचे आणि सहभागी संघांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Ratnagiri vartahar
श्री सनगरेवाडी सार्वजनिक मंडळ आयोजित सनगरेवाडी चषक २०२५ उत्साहात संपन्न

गुहागर, २ मार्च २०२५ – श्री सनगरेवाडी सार्वजनिक मंडळाच्या क्रीडा समितीच्या वतीने भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मुंबई, वसई येथे करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष श्री. शैलेश कावणकर, श्री. संतोष आलीम आणि मंडळातील मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

 

गुहागर तालुक्यातील विविध वाड्यांमधून एकूण २४ संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. महेश धनावडे, श्री. विजय गोताड, श्री. अनंत मालप आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. गावातून विशेषतः स्थानिक मंडळाचे पदाधिकारी या स्पर्धेसाठी आवर्जून हजर होते.

 

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रायोजकांचे आणि सहभागी संघांचे मोलाचे सहकार्य लाभले. मंडळाच्या वतीने क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक आणि आरोग्य क्षेत्रात सातत्याने उपक्रम राबवले जातात. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील सामने ४ षटकांचे, तर अंतिम फेरीतील सामने ३ षटकांचे खेळवण्यात आले.

 

स्पर्धेचे विजेते संघ:

 

???? प्रथम क्रमांक – मितेश ११, सनगरेवाडी

???? द्वितीय क्रमांक – तांबडवाडी क्रिकेट संघ, तवसाळ

???? तृतीय क्रमांक – निर्मला ११, तवसाळ

 

व्यक्तिगत पुरस्कार:

 

???? उत्कृष्ट फलंदाज – सौरभ घाणेकर (तांबडवाडी, तवसाळ)

???? उत्कृष्ट गोलंदाज – स्वप्निल घाणेकर (निर्मला ११, तवसाळ)

???? मालिकावीर – ऋषी गोताड (मितेश ११, सनगरेवाडी)

श्री सनगरेवाडी सार्वजनिक मंडळ आयोजित सनगरेवाडी चषक २०२५ उत्साहात संपन्न

स्पर्धेसाठी दानशूर व्यक्तींनी बक्षिसे, पाण्याची व्यवस्था, चेंडू आणि देणगी स्वरूपात मोलाचे योगदान दिले, त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

 

संध्याकाळी झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात विजेत्या संघांचा आणि खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण स्पर्धा खेळीमेळीच्या आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. सनगरेवाडी चषक २०२५ ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मंडळाने सर्वांचे आभार मानले.

श्री सनगरेवाडी सार्वजनिक मंडळ आयोजित सनगरेवाडी चषक २०२५ उत्साहात संपन्न

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें