बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन

Women Day
बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे आयोज dummy copy Pic

नवी मुंबई (मंगेश जाधव)

बौद्धजन पंचायत समिती संलग्न महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याहीवर्षी *दि. ८ मार्च २०२५ सायंकाळी ५:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे* महिला मंडळाच्या अध्यक्षा सुशीलाताई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर प्रमुख मार्गदर्शन लाभणार असून मनिषाताई आनंदराज आंबेडकर प्रमुख उपस्थिती लाभणार असून डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स एन्ड इंकोनिमिक्सच्या प्राचार्या डॉ. यशोधरा एस. वराळे प्रमुख व्यक्ता म्हणून उपस्थित राहणार आहे.

 

सदर कार्यक्रमास उपसभापती विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे, उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे, एच. आर. पवार, मनोहर सखाराम मोरे, चंद्रमनी तांबे, अंकुश सकपाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून सूत्रसंचालनाची धुरा मध्यवर्ती महिला मंडळाच्या सरचिटणीस अंजलीताई मोहिते करणार आहेत तरी सर्व व्यवस्थापक मंडळ सदस्य, चिटणीस, सर्व शाखा, त्यांचे पदाधिकारी, सभासद, सदस्य, बौद्धाचार्य, महिला मंडळ यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सरचिटणीस राजेश घाडगे यांनी बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात केले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें