पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 12 मार्च रोजी सावर्डे येथे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 12 मार्च रोजी सावर्डे येथे

 

उमेदवारांना नोंदणी व संधीचा लाभ घेण्याचे आवाहन

 

रत्नागिरी, ५ मार्च: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन 12 मार्च रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे. हा मेळावा सह्याद्री शिक्षण संस्था, सह्याद्री तंत्रनिकेतन, सावर्डे, ता. चिपळूण येथे होणार आहे.

 

रोजगारासाठी नोंदणी अनिवार्य…

 

या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच, आधीच नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपले प्रोफाईल अद्ययावत करावे. नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी आपल्या युझर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने 12 मार्च रोजी ऑनलाइन अर्ज करावा.

 

मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे

 

रोजगार मेळाव्याच्या दिवशी उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांनी बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या प्रती व ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे.

 

संपर्क साधण्याचे आवाहन..

 

ज्या उमेदवारांची अद्याप नोंदणी झालेली नाही त्यांनी त्वरित कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.

 

सहाय्यक आयुक्त श्रीमती इनुजा शेख यांनी उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

 

— आपले भविष्य घडविण्याची संधी! रोजगार मेळा

व्यात सहभागी व्हा!

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें