रत्नागिरीत ७५ हरवलेले मोबाईल नागरिकांना परत
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईल हँडसेट्स त्यांच्या मूळ मालकांना परत देण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि. 06 मार्च 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमास कोंकण परिक्षेत्राचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संजय दराडे (भा.पो.से.) यांच्या हस्ते मोबाईल परत देण्यात येणार आहेत. तसेच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी ७५ मोबाईल त्यांचे मूळ मालकांना परत देण्यात येणार असून, यामुळे हरवलेले मोबाईल मिळवण्यासाठी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तरी संबंधित नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
– धनंजय कुलकर्णी (भा.पो.से.)
पोलीस अधीक्षक, रत्नागिरी















