विधानभवनाच्या लॉबीतून मंत्री उदय सामंत यांचा मोबाईल चोरी – सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विधानभवनाच्या लॉबीतून मंत्री उदय सामंत यांचा मोबाईल चोरी – सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

मुंबई : राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. मात्र, या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचा मोबाईल फोन विधानभवनाच्या लॉबीतून चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.

कायदे तयार होणाऱ्या आणि राज्याच्या कारभाराचा गाभा असलेल्या विधानभवनाच्या परिसरातच मंत्रीचाच फोन चोरीला जाणं ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. या घटनेमुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

सुरक्षेवर उठले प्रश्न

विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, तसेच विविध मंत्री आणि नेते उपस्थित असतात. अशा उच्च सुरक्षा व्यवस्थेच्या ठिकाणी चोरीसारखा प्रकार घडल्याने सुरक्षेच्या उपाययोजनांवर शंका उपस्थित केली जात आहे.

या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, मंत्रीचाच मोबाईल चोरीला जात असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विधानभवनात सुरक्षा वाढवण्याची मागणी

ही घटना समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या सुरक्षेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, या चोरीच्या घटनेबाबत तपास सुरू असून, मंत्री उदय सामंत यांच्या मोबाईलमध्ये काही संवेदनशील माहिती होती का? याचीही चौकशी केली जात आहे. संपूर्ण घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन, सुरक्षेच्या उपाययोजना अधिक मजबूत केल्या जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

घाटीवळे ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार; चौकशी अहवाल तब्बल १६ महिन्यांनी, तोही कथित खोट्या कागदपत्रांसह

घाटीवळे ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार; चौकशी अहवाल तब्बल १६ महिन्यांनी, तोही कथित खोट्या कागदपत्रांसह *रत्नागिरी (प्रतिनिधी): निलेश रहाटे घाटीवळे ग्रामपंचायतीच्या...
Read More
घाटीवळे ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार; चौकशी अहवाल तब्बल १६ महिन्यांनी, तोही कथित खोट्या कागदपत्रांसह

स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात विक्रांतदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांना झाडे वाटप; पुढील वर्षी झाडांची...
Read More
स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक

पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक   राजापूर - संदीप शेमणकर राजापूर तालुक्यातील  जैतापूर परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरवणाऱ्या...
Read More
पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक

मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन

मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन   युवा गझलकारांचा राष्ट्रीय मेळावा; भीमराव पांचाळे यांना जीवनगौरव, विशाल मोहितेंना युवा...
Read More
मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल 

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल  राजापूर -संदीप शेमणकर राजापूर तालुक्यातील मौजे हातिवले गावची...
Read More
जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल 

कुणबी समाजासमोर आदर्शवत संदेश वडिलांच्या तेराव्या दिवशी वृक्षारोपण; बंडबे कुटुंबाने पाडला नवा पायंडा

कुणबी समाजासमोर आदर्शवत संदेश वडिलांच्या तेराव्या दिवशी वृक्षारोपण; बंडबे कुटुंबाने पाडला नवा पायंडा राजापूर - संदीप शेमणकर  बदलत्या काळासोबत जुन्या,...
Read More
कुणबी समाजासमोर आदर्शवत संदेश  वडिलांच्या तेराव्या दिवशी वृक्षारोपण; बंडबे कुटुंबाने पाडला नवा पायंडा

मेरा युवा भारत रत्नागिरी यांचे मार्फत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

मेरा युवा भारत रत्नागिरी यांचे मार्फत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा यू गुहागर - युवा कार्यक्रम एवम खेल मंत्रालय भारत...
Read More
मेरा युवा भारत रत्नागिरी यांचे मार्फत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

लाचखोरांवर कारवाईचा बडगा; चिपळुणात डॉक्टर तर धुळ्यात पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!

लाचखोरांवर कारवाईचा बडगा; चिपळुणात डॉक्टर तर धुळ्यात पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात! *रत्नागिरी/ राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दोन वेगवेगळ्या कारवाया...
Read More
लाचखोरांवर कारवाईचा बडगा; चिपळुणात डॉक्टर तर धुळ्यात पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!

धक्कादायक: रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी; उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

 धक्कादायक: रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी; उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय **पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत शिवसेना (उबाठा)...
Read More
धक्कादायक: रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी; उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

लांज्यात बिबट्याचा थरारक हल्ला; घरात घुसून ५२ वर्षीय व्यक्तीसह युवक जखमी

लांज्यात बिबट्याचा थरारक हल्ला; घरात घुसून ५२ वर्षीय व्यक्तीसह युवक जखमी   बेणी बुद्रुकच्या कुसुममळेवाडीत मध्यरात्रीची घटना; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण,...
Read More
लांज्यात बिबट्याचा थरारक हल्ला; घरात घुसून ५२ वर्षीय व्यक्तीसह युवक जखमी