पूर्णगड शाळेत नारळ सोलण्याच्या मशीनचे प्रात्यक्षिक

पूर्णगड (ता. रत्नागिरी) – जिल्हा परिषद शाळा पूर्णगड मराठी नं. १ येथे कार्यानुभव उपक्रमांतर्गत नारळ सोलण्याच्या मशीनचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. कोकणात नारळ सोलण्याचे पारंपरिक तंत्र कोयतीच्या सहाय्याने वापरले जात असे. मात्र, आधुनिक काळात नारळ सोलण्याचे यंत्र उपलब्ध झाले आहे.
या यंत्राचा वापर करून नारळ सोलण्याची प्रक्रिया शिक्षक तसेच गावातील जाणकार पापा मुरकर यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवून दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः नारळ सोलण्याचा सराव केला.
“मुलांना जीवनोपयोगी शिक्षण मिळावे,” या हेतूने शाळेने हा उपक्रम राबवला. या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा तारये मॅडम यांनी कौतुक केले. तसेच पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे आणि राजेंद्र रांगणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.