कसबा येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे ११ मार्च रोजी धर्म रक्षण दिन विविध कार्यक्रमांनी होणार साजरा….

कसबा येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे ११ मार्च रोजी धर्म रक्षण दिन विविध कार्यक्रमांनी होणार साजरा….

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

???? मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम राहणार उपस्थित

 

छत्रपती संभाजी महाराज धर्म रक्षण दिन समिती संगमेश्वरच्या वतीने आयोजन

 

देवरूख– धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्म रक्षण दिन समिती संगमेश्वरच्यावतीने कसबा येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे ११ मार्च रोजी सकाळी ९.३० वा. धर्म रक्षण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे संगमेश्वर-चिपळूण विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी आज गुरूवारी देवरूख येथे पत्रकार परिषदेत दिली.

 

देवरूख येथील भाजपच्या कार्यालयात आज गुरूवारी सायंकाळी ही पत्रकार परिषद पार पडली. यावेळी भाजपचे अभिजित शेट्ये, सुधीर यशवंतराव, अभिजित सप्रे, पांड्या आंबेकर, संजय नटे, शिंदे गटाचे प्रसाद सावंत आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना प्रमोद अधटराव म्हणाले की, भाजपचे माजी आमदार श्री प्रमोद जठार यांच्या संकल्पनेतून धर्म रक्षण दिनानिमित्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अलौकिक गाथा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्राध्यापक योगेश माणिकराव चिकटगावकर हे सादर करणार आहेत.

 

शंभूराजे पोवाडा शिवशाहीर यशवंत सुरेश जाधव, डॉ अमित शिंदे, संगीत संयोजन विकास मारुती कोकाटे दांडपट्टा श्री चंद्रकांत साठे आणि शंभू महाआरती इत्यादि कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आ. प्रविण दरेकर, प्रसाद लाड, आ. शेखर निकम, आ. किरण सामंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच हिंदू संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला शंभूप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्म रक्षण दिन समिती संगमेश्वरच्या वतीने करण्यात आले आहे.

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें