डॉ. नेहा सावंत यांना सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा अ. का. प्रियोळकर पुरस्कार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ. नेहा सावंत यांना सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा अ. का. प्रियोळकर पुरस्कार….

डॉ. नेहा सावंत यांना ‘कुपारी बोलीतील साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या पीएच. डी प्रबंधासाठी मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा मानाचा अ. का. प्रियोळकर पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

डॉ. नेहा सावंत यांना सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा अ. का. प्रियोळकर पुरस्कार

मुंबई – संदीप शेमणकर ????️

मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे मराठीतील सर्वोत्कृष्ट पीएच.डी प्रबंधासाठी पुरस्कार दिला जातो. यावर्षी सर्वोत्कृष्ट पीएच.डी प्रबंधासाठी डॉ. नेहा किशोर सावंत यांना पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या ‘कुपारी बोलीतील साहित्याचा चिकित्सक अभ्यास (प्रकाशित व अप्रकाशित)’ या प्रबंधाची निवड करण्यात आली. मराठी भाषा दिनी पारितोषिक देऊन डॉ. नेहा सावंत यांना गौरवण्यात आले. पारितोषिक वितरण सोहळा मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रूझ येथील कालिना संकुलात पार पडला.

डॉ. नेहा सावंत यांनी ‘कुपारी बोलीतील साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर अभ्यासपूर्ण प्रबंध सादर केला. यासाठी त्यांना प्रचंड मेहनतही घ्यावी लागली. प्रबंधासाठी त्यांना डॉ. अलका मटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कै. प्रा. अ. का. प्रियोळकर स्मृती पारितोषिक समितीने २०२४/२०२५ या वर्षातील पुरस्कारासाठी मराठीतील ‘सर्वोत्कृष्ट पीएच.डी प्रबंध’ म्हणून डॉ. नेहा किशोर सावंत यांच्या ‘कुपारी बोलीतील साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या प्रबंधाची निवड केली.

डॉ. नेहा सावंत हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व. अंधेरी येथील भवन्स महाविद्यालयात त्या १९९१ पासून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गेली ३४ वर्ष त्या विद्यार्थी घडविण्याचे मोलाचे कार्य करत आहेत. मराठी वाड्मय शिकवण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना समजेल, भविष्यात त्याचा उपयोग होईल या हेतूने अभ्यासक्रमाची आखणीही केली. त्यामुळे भवन्समध्ये मराठी भाषा विषय घेऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे.

डॉ. नेहा सावंत यांच्या मनमिळावू स्वाभावामुळे भवन्स विद्यापीठातील प्राध्यापकांमध्ये त्या प्रसिद्ध तर आहेतच, मात्र विद्यार्थ्यांच्याही त्या आवडत्या अर्थात विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका आहेत. आजही अनेक विद्यार्थी आम्ही नेहा मॅडममुळे घडलो आहोत, असे अभिमानाने सांगतात.

भवन्स विद्यालयात मराठी विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यासाठी डॉ. नेहा सावंत हिरीरीने पुढाकार घेतात. कोणताही कार्यक्रम असो किंवा अन्य कोणता उपक्रम, तो उत्तम झाला पाहिजे याच्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. डॉ. नेहा सावंत यांच्या प्रबंधाला पुरस्कार मिळाल्याने विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या डॉ. नेहा सावंत मॅडम यांचेही स्वप्न पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के