वैदेही रानडे रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त
रत्नागिरी, ७ मार्च: राज्य शासनाने आज आयएएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या असून, वैदेही रानडे यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वैदेही रानडे या २०१५ बॅचच्या आयएएस अधिकारी असून, यापूर्वी त्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), मुंबई येथे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत होत्या. त्यांना प्रशासनातील विविध विषयांमध्ये मोठा अनुभव असून, त्यांनी यापूर्वीही रत्नागिरी जिल्ह्यात कार्य केले आहे.
राज्यातील अन्य महत्त्वाच्या बदल्या:
आज झालेल्या प्रशासकीय बदल्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची नवीन पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.
1. राधाबिनोद अरिबम शर्मा – महानगर आयुक्त, MMRDA, मुंबई यांची मीरा-भायंदर महानगरपालिकेचे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती.
2. एम.जे. प्रदीप चंद्रेन – अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), मुंबई यांची अतिरिक्त महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका म्हणून नियुक्ती.
3. बाबासाहेब बेलदार – अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांची अल्पसंख्याक विकास आयुक्त म्हणून नियुक्ती.
4. जगदीश मिनियार – CEO, स्मार्ट सिटी, छत्रपती संभाजीनगर यांची जिल्हा परिषद, जालना येथे CEO म्हणून नियुक्ती.
5. गोपीचंद कदम – CEO, स्मार्ट सिटी, सोलापूर यांची अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे येथे नियुक्ती.
6. डॉ. अर्जुन चिखले – सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर यांची फी नियामक प्राधिकरण, मुंबई येथे सचिव म्हणून नियुक्ती.
7. डॉ. पंकज आशिया – जिल्हाधिकारी, यवतमाळ यांची जिल्हाधिकारी, अहिल्यानगर येथे नियुक्ती.
राज्यातील प्रशासकीय फेरबदलांमुळे विविध विभागांमध्ये नव्या जबाबदाऱ्या मिळाल्या असून, रत्नागिरी जिल्ह्यात वैदेही रानडे यांच्या नियुक्तीने विकास कामांना गती मिळण्याची
अपेक्षा व्यक्त केली जात आहे.