जागतिक महिला दिनानिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन…
निर्मल ग्रामपंचात पडवे यांचं आयोजन
पडवे, ७ मार्च २०२५: जागतिक महिला दिनानिमित्त शनिवार, ७ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा ग्रामस्थ मुस्तर खले यांच्या घरी होणार असून, ग्रामपंचायत सरपंच यांच्या वतीने सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या विशेष ग्रामसभेत महिला सबलीकरण, स्वयंसहाय्यता बचत गट, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ग्रामस्थ, महिला बचत गट प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शिक्षक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सभेत अजंठा वर असणाऱ्या सर्व विषयावर चर्चा होणे आवश्यक आहे.
निर्मल ग्रामपंचायत, पडवे यांच्यावतीने सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विशेष ग्रामसभेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंचांनी केलेआहे.
????खालील लेख वाचा….????????
????. आज जागतिक महिला दिन + विशेष लेख

???? जागतिक महिला दिनानिमित सर्व भगिनीं ना रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र कडून शुभेछ्या ????