बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आता रत्नागिरी शहरात..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आता रत्नागिरी शहरात 

रत्नागिरी:- महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिटयूटचे (BKVTI) मारुती मंदिर येथील एस. बी. नलावडे कमर्शिअल सेंटर येथील वास्तूत स्थलांतर होणार आहे. यानिमित्त येत्या १० मार्च रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याच वेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वुमेन्स फेस्ट कार्यक्रम होणार आहे.

 

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून इफको टोकियोच्या संचालक व मानव विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. उमा सुरेश प्रभू आणि विशेष अतिथी सुप्रसिद्ध अभिनेत्री व कृषी उद्योजिका सौ. संपदा जोगळेकर-कुळकर्णी या उपस्थित राहणार आहेत.

 

यानिमित्त माळनाका येथील जयेश मंगल पार्क येथे वुमेन्स फेस्ट हा भव्य कार्यक्रम होणार आहे. १० मार्च रोजी दुपारी दुपारी २:३० वाजल्यापासून कार्यक्रम सुरू होणार आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योग तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा गौरव केला जाणार आहे. सहभागी उद्योगिनी महिलांच्या उद्योगांचे निवडक स्टॉलचे प्रदर्शनही असणार आहे.

 

या वेळी मान्यवर प्रमुख पाहुणे व सेलिब्रेटी अतिथी यांची उपस्थिती व संवाद असा कार्यक्रम होईल. याच कार्यक्रमात पुण्याच्या मणीलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधील (MNVTI) विद्यार्थिनी भव्य फॅशन शो सादर करणार आहेत. सर्व महिला भगिनींसाठी कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य आहे.

 

शिरगाव, रत्नागिरी येथे बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येतात. यामध्ये विविध फूड प्रोसेसिंग- पाककृती, खाद्यपदार्थ, मोदक, केक, सरबत, लोणचे बनवण्याचे प्रशिक्षण दिले,तसेच शिवणकामाचेही व फॅशन डिझाईन प्रशिक्षण, तसेच ब्युटी पार्लर मधील विविध अभ्यासक्रम व उपक्रम राबवले.

महिला सक्षमीकरणासाठी ही संस्था कार्यरत असून या संस्थेचा बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (BKVTI ) हा एक विभाग आता रत्नागिरीमध्ये मध्यवर्ती ठिकाणी मारुती मंदिर येथील सुसज्ज वास्तूत स्थलांतरित होत आहे.

 

नवीन ठिकाणी ब्युटी पार्लर, फॅशन डिजाईन, फूड प्रोसेसिंग व ट्रॅव्हल्स टुरिझम व हॉस्पीटीलिटीचे अद्ययावत अभ्यासक्रम व वर्कशॉप राबवले जाणार आहेत. यामुळे आता रत्नागिरी शहरातच महिलांना नवनवीन कोर्सेस करणे शक्य होणार आहे.

 

या निमित्ताने होणाऱ्या वुमेन्स फेस्ट कार्यक्रमाला व भव्य फॅशन शो या कार्यक्रमासाठी रत्नागिरी जिल्हा व परिसरातील जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपकार्याध्यक्ष व प्रकल्प अध्यक्षा सौ. विद्या कुलकर्णी, रत्नागिरी प्रकल्पप्रमुख मंदार सावंतदेसाई, समन्वयक स्वप्नील सावंत आणि स्थानिय व्यवस्थापन सदस्यांनी केले आहे.

 

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन