राज्यात प्रीपेड मीटरवर बंदी; ग्राहकांसाठी इलेक्ट्रॉनिक मीटर अनिवार्य – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : राज्यातील वीज ग्राहकांसाठी प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्याऐवजी इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली बसवली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली.
विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य विक्रम काळे यांनी स्मार्ट प्री-पेड वीज मीटर यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ग्राहकांसाठी प्रीपेड नव्हे, तर पोस्टपेड इलेक्ट्रॉनिक मीटर बसवले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
वीज ग्राहकांना १० टक्के सवलत
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याचे काम सुरू असून, या मीटरचा वापर करणाऱ्या ग्राहकांना वीज वापरावर १० टक्के सवलत दिली जाणार आहे. हा बदल सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. लवकरच राज्यभरात इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली कार्यान्वित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वीज ग्राहकांना सोयीस्कर बिलिंग आणि सवलतीचा लाभ मिळेल, तसेच वीज चोरीला आळा बसण्यास मदत होईल.

Author: Ratnagiri Vartahar
⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️
Discover more from Ratnagiri Vartahar
Subscribe to get the latest posts sent to your email.