राजापूर आगाराला नव्याने प्राप्त झालेल्या चार नवीन एस टी बसचा आमदार किरण सामंत यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न
राजापूर – संदीप शेमणकर ????️
राजापूर आगारात प्राप्त झालेल्या 6 प्रणालीच्या चार नवीन बसचा लोकार्पण सोहळा रविवारी दुपारी राजापूर, लांजा, साखरपाचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. राजापूर आगाराला चार नवीन बस मिळाल्याने प्रवासी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.
राजापूर आगाराला चार नवीन बस प्राप्त झाल्या आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला. आमदार किरण सामंत यांच्या समवेत
विभाग नियंत्रक रत्नागिरीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यंत्रअभियंता रत्नागिरी विभागाचे अनंत कुलकर्णी, विभागीय वाहतूक अधिकारी
प्रमोद यादव राजापूरचे आगार व्यवस्थापक अजितकुमार गोरसाळे, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले, माजी जिल्हाप्रमुख विलास चाळके, प्रकाश कुवळेकर, उमेश पराडकर, अशपाक हाजू, यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.















