प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रूणालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांह अन्य पदे तात्काळ भरण्याची शिवसेना तालुकाध्यक्ष दिपक नागले यांची मागणी

प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रूणालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांह अन्य पदे तात्काळ भरण्याची शिवसेना तालुकाध्यक्ष दिपक नागले यांची मागणी

 

राजापूर – संदीप शेमणकर 

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना त्या ठिेकाणी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेले स्थानिक बीएमएस डॉक्टर आणि सहकार्‍यांकडून रूग्णांना चांगली वैद्यकीय सेवा दिली जाते. मात्र, एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध झाल्यानंतर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या स्थानिक बीएमएस डॉक्टरला सेवामुक्त केले जाते. एमबीबीएस डॉक्टर पुढील वैद्यकीय शिक्षण वा ट्रेनिंगसाठी काही कालावधीसाठी गेल्याने रिक्त झालेल्या जागेवर पुन्हा एकदा स्थानिक बीएमएस डॉक्टरची नियुक्ती केली जाते. त्यातून सर्वसामान्यांना मिळणार्‍या वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडाला असून हे थांबणार कधी ? असा सवाल शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिपक नागले यांनी उपस्थित केला आहे.

पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लोकरे यांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. नागले, नाना कोरगावकर, सुनिल गुरव, सिद्धी शिर्सेकर, हर्षदा खानविलकर, मधु बाणे, सुर्यकांत सुतार आणि पदाधिकार्‍यांनी आज भेट घेतली. या भेटीच्यावेळी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रूणालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांह अन्य पदे तात्काळ भरणा करण्याची कार्यव्हावी आणि रूग्णांना चांगली सेवा मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तशी माहिती श्री. नागले यांनी दिली.

ग्रामीण भागातील रूग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी या उद्देशाने ग्रामीण भागामध्ये शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी केली आहे. त्याला रूग्णांकडूनही प्रतिसाद मिळत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनेक जागा विविध कारणांमुळे रिक्त राहीलेल्या आहेत. तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रातील एमबीबीएस डॉक्टरांच्या नऊपैकी केवळ तीन जागा भरताना तब्बल सहा आरोग्य केंद्रातील जागा गेल्या कित्येक महिन्यांपासून रिक्त राहीलेल्या आहेत. ज्या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर नाहीत त्या ठिकाणी स्थानिक बीएमएस डॉक्टरची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेली आहे. या बीएमएस डॉक्टरांकडून सहकार्‍यांच्या साथीने चांगली वैद्यकीय सेवा दिली जात आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्राला एम बी बी एस डॉक्टर उपलब्ध झाल्यानंतर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या स्थानिक बीएमएस डॉक्टरला सेवेतून मुक्त केले जाते. एमबीबीएस डॉक्टरांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काही महिने सेवा बजावल्यानंतर हे डॉक्टर पुढील वैद्यकीय शिक्षण वा ट्रेनिंगसाठी काही कालावधीसाठी जात असतात. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पुन्हा एकदा स्थानिक बीएमएस डॉक्टरची नियुक्ती केली जाते. या सार्‍या प्रशासकीय खेळखंडोबामध्ये रूग्णांना मिळणार्‍या वैद्यकीय सेवेचा पुरता बोजवारा उडतो. त्याचवेळी सातत्याने सेवामुक्त केले गेल्याने स्थानिक बी एम एस डॉक्टरच्या करिअरही धोक्यात येते. या सार्‍यामध्ये सर्वसामान्य रूग्णांची पुरती हेळसांड होत असून त्याचा विचार करीत या ठिकाणी कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध होण्याबाबत योग्य कार्यवाही व्हावी अशी मागणी श्री. नागले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें