संगमेश्वर तालुक्यात शिवसेनेचा भगवा पुन्हा डौलाने फडकवण्याचा निर्धार

संगमेश्वर तालुक्यात शिवसेनेचा भगवा पुन्हा डौलाने फडकवण्याचा निर्धार.

देवरूखमध्ये शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्ता मेळाव्याला तुफान प्रतिसाद

संगमेश्वर तालुक्यात शिवसेनेचा भगवा पुन्हा डौलाने फडकवण्याचा निर्धार.

 

देवरूख- प्रतिनिधी 

देवरूख-  येथे सोमवारी झालेल्या शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्ता मेळाव्याला शिवसैनिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी शिवसैनिकांमध्ये स्फुलिंग चेतवत “संगमेश्वर तालुक्यात शिवसेनेचा भगवा पुन्हा डौलाने फडकवूया” असे आवाहन केले. या मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटन मजबूत करण्याचा निर्धार केला.

 

मराठा भवन, देवरूख येथे पार पडलेल्या या मेळाव्यात सामान्य कार्यकर्त्यांना मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली. यावेळी अनेकांनी “काही जण पक्ष सोडून गेले असले तरी खरी ताकद तळागाळातील शिवसैनिकांमध्येच आहे. आम्हाला फक्त बळ देण्याची गरज आहे.” असे स्पष्ट केले. तसेच, “संघटनेतील रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत,” अशी मागणीही करण्यात आली.

 

जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिवसेनेने आम्हाला दिलेले प्रेम आम्ही कधीही टाकून जाणार नाही. गेलेल्यांची चिंता न करता सेनेचे गतवैभव परत मिळवूया. आजच्या मेळाव्याने स्पष्ट केले आहे की जिल्ह्यात पुन्हा इतिहास घडणार आहे.”

 

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे यांनीही “सेनेचे वैभव परत आणण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवून मैदानात उतरावे. आम्ही तुमच्या सोबत आहोत,” असे शिवसैनिकांना आश्वासन दिले.

 

यावेळी जिल्हा समन्वयक रविंद्र डोळस, लोकसभा संपर्कप्रमुख नेहा माने, जिल्हा संघटक वेदा फडके, युवासेना राज्य सहसचिव प्रद्युम्न माने, तालुका संपर्कप्रमुख मुकुंद पड्याळ, तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

 

मेळाव्यास रवींद्र माने, दत्ता कदम, बंड्या बोरूकर, चंद्रकांत शिंदे, ऐश्वर्या घोसाळकर, प्रभाकर घाणेकर, दादा शिंदे, मधुकर गुरव, छोट्या गवाणकर, भाई शिंदे, सतिश सप्रे, इस्त्याक कापडी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

 

या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी “सेनेचे ताकदवान संघटन उभे करण्याचा निर्धार” व्यक्त केला. पुढील काळात शिवसेनेचा झेंडा पुन्हा बुलंद करण्यासाठी सर्वांनी एकजूट होण्याचा संदेश या मेळाव्यातून देण्यात आला.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें