मामासाहेब भुवड कॉलेज ऑफ कॉमर्स अँड हॉटेल मॅनेजमेंट व देवरुख इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न

मामासाहेब भुवड कॉलेज ऑफ कॉमर्स अँड
हॉटेल मॅनेजमेंट व देवरुख इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न

मामासाहेब भुवड कॉलेज ऑफ कॉमर्स अँड
हॉटेल मॅनेजमेंट व देवरुख इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न

संगमेश्वर – संदीप शेमणकर
कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संगमेश्वर – मुंबई संस्थेचे, मा. मामासाहेब भुवड कॉलेज ऑफ कॉमर्स अँड हॉटेल मॅनेजमेंट व देवरुख इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग देवरुख ,येथे ८ मार्च जागतिक महिला दिन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शिका डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली. कॉलेज समन्वयिका प्रा. सोनल पेणकर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मित्र-मैत्रिणी उपस्थित होते.
प्रारंभी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व फ्लॉरेन्स नायटिंगल यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन तसेच पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रमुख अतिथी व मान्यवरांचे यथोचित स्वागतानंतर नर्सिंग व वाणिज्य अकाउंट अँड फायनान्स च्या विद्यार्थिनींनी स्त्रियांच्या जीवनावरील अनेक अवस्थांचे दर्शन कविते च्या माध्यमातून करून दिले.या कार्यक्रमास उपस्थित प्रा. वैभव पवार व प्रा. सारा कदम यांनी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या उद्देशाला अनुसरून डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जागतिक महिला दिनानिमित्त विविध मनोरंजनाचे कार्यक्रम विद्यार्थीनी साठी आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अनन्या मते व कु. सिमरन भुरवणे या नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी केले. तसेच प्रा. श्वेता शिंदे, प्रा. मृणाल गिजबिले , प्रा. प्रतिज्ञा माळी, प्रा. सुरज ढोणे, व शिक्षकेत्तर कर्मचारी सौ.हर्षदा जागुष्टे, श्री. निनाद कांगणे यांनीही हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक प्रयत्न केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें