विद्यार्थ्यांनी योगाच्या माध्यमातून स्वतःला परिपूर्ण बनवावे : रमाताई जोग

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यार्थ्यांनी योगाच्या माध्यमातून स्वतःला परिपूर्ण बनवावे : रमाताई जोग

जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडीच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत योग शिबीराचे आयोजन

रत्नागिरी प्रतिनिधी : निलेश रहाटे

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला निरोगी जीवन जगण्यासाठी आणि विविध आजारावर मात करण्यासाठी योग आणि प्राणायाम हा अत्यंत आवश्यक घटक असून त्याद्वारे निरोगी आणि दीर्घायुषी जगता येत असल्याने सर्वानी योग शिबिरात सहभागी होऊन स्वतःला विविध रोगापासून दूर ठेवत निरोगी आयुष्य जगण्यासाठी परिपूर्ण बनवावे असे असे आवाहन पतंजली योग समितीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्या रमाताई जोग यांनी केले.

त्या रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी पतंजली योग समितीच्या सहकार्याने शाळा आणि शाळा परिसरातील सर्व विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांच्यासाठी मोफत योग शिबीराचे आयोजन उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.

यावेळी सर्वप्रथम दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांपैकी सामाजिक कार्यकर्ते बाळशेठ जोग यांनीही योगाचे महत्व सांगताना शाळेने आयोजित केलेल्या योग शिबीराचे कौतुक करताना शुभेच्छा दिल्या. तसेच चित्रलेखा गांधी यांनीही विद्यार्थी, पालक यांच्यासाठी सदर शिबिराची उपयुक्तता सांगितली.

उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष आणि शाळा विकास समितीचे अध्यक्ष अप्पा धनावडे यांनीही या शिबिरात जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी ग्रुप ग्रामपंचायत वाटद मिरवणेचे सरपंच अमित वाडकर, सामाजिक कार्यकर्ते शेखरशेठ भडसावळे, कळझोंडी गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संदीप पवार, सामाजिक कार्यकर्त्या चित्रलेखा गांधी, बालरक्षक विश्वनाथ शिर्के, उपाध्यक्ष मारुती कुर्टे, अनिल रेवाळे यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या शिबीराचे नियोजन पंचायत समिती रत्नागिरीच्या गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. हे शिबीर अत्यंत नियोजनपूर्वक पतंजली योग समितीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्या रमाताई जोग यांच्या मार्गदर्शनाखाली रोज सकाळी पाच ते सात या वेळेत संपन्न होणार आहे. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा स्वाती धनावडे यांच्यासह शाळा विकास समिती, शालेय व्यवस्थापन समिती, वाटद कवठेवाडी, वाटद तांबटकरवाडी, वाटद धोपटवाडी मधील सर्व पालक आणि ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत. तसेच या शिबिरामध्ये शिक्षण प्रेमी उदयजी रहाटे आणि नितीनजी झगडे यांनीही सहभाग घेऊन गावातील सर्व ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आभार शाळेतील शिक्षिका राधा नारायणकर यांनी मानले.

Nilesh Rahate
Author: Nilesh Rahate

???? निलेश रहाटे ???? मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

भारत–पाकिस्तान महामुकाबला : इतिहास, प्रतिष्ठा आणि थरार; कोलंबोत आज रंगणार क्रिकेटचा महायुद्ध

भारत–पाकिस्तान महामुकाबला : इतिहास, प्रतिष्ठा आणि थरार; कोलंबोत आज रंगणार क्रिकेटचा महायुद्ध मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक...
Read More
भारत–पाकिस्तान महामुकाबला : इतिहास, प्रतिष्ठा आणि थरार; कोलंबोत आज रंगणार क्रिकेटचा महायुद्ध

SRK तायक्वांदो क्लबच्या स्वरा साखळकर हिCHI जिल्हा ओपन तायक्वांदो स्पर्धेत दोन सुवर्णपदक आणि एक कास्यपदकाची कमाई

🟣 SRK तायक्वांदो क्लबच्या स्वरा साखळकर हिCHI जिल्हा ओपन तायक्वांदो स्पर्धेत दोन सुवर्णपदक आणि एक कास्यपदकाची कमाई रत्नागिरी - रत्नागिरी...
Read More
SRK तायक्वांदो क्लबच्या स्वरा साखळकर हिCHI जिल्हा ओपन तायक्वांदो स्पर्धेत दोन सुवर्णपदक आणि एक कास्यपदकाची कमाई

वाटदच्या सुपुत्राला राज्यस्तरीय सन्मान : संदीप जाधव यांना ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ पुरस्कार जाहीर

वाटदच्या सुपुत्राला राज्यस्तरीय सन्मान : संदीप जाधव यांना ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ पुरस्कार जाहीर   रत्नागिरी प्रतिनिधी : निलेश रहाटे  ...
Read More
वाटदच्या सुपुत्राला राज्यस्तरीय सन्मान : संदीप जाधव यांना ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ पुरस्कार जाहीर

मुंबईत बांगलादेशी घुसखोर कसे येतात? — आदित्य ठाकरेंचा सरकारला थेट सवाल

मुंबईत बांगलादेशी घुसखोर कसे येतात? — आदित्य ठाकरेंचा सरकारला थेट सवाल   मुंबई | प्रतिनिधी आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील कथित...
Read More
मुंबईत बांगलादेशी घुसखोर कसे येतात? — आदित्य ठाकरेंचा सरकारला थेट सवाल

जि.प.आदर्श शाळा खोडदे नं.१ येथे दि.१४ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार समारंभ आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन

जि.प.आदर्श शाळा खोडदे नं.१ येथे दि.१४ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार समारंभ आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन आबलोली (संदेश कदम) गुहागर...
Read More
जि.प.आदर्श शाळा खोडदे नं.१ येथे दि.१४ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार समारंभ आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन

टकर–डेलानीचा धडाका, आयर्लंडचा ओमानवर ९६ धावांनी दणदणीत विजय; टी–२० विश्वचषकात विक्रमांची बरसात

टकर–डेलानीचा धडाका, आयर्लंडचा ओमानवर ९६ धावांनी दणदणीत विजय; टी–२० विश्वचषकात विक्रमांची बरसात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक...
Read More
टकर–डेलानीचा धडाका, आयर्लंडचा ओमानवर ९६ धावांनी दणदणीत विजय; टी–२० विश्वचषकात विक्रमांची बरसात

गुहागर तालुका सरपंच संघटनेच्या उपाध्यक्षपदी आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांची फेरनिवड

गुहागर तालुका सरपंच संघटनेच्या उपाध्यक्षपदी आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांची फेरनिवड आबलोली (प्रतिनिधी) गुहागर तालुका सरपंच संघटनेची बैठक...
Read More
गुहागर तालुका सरपंच संघटनेच्या उपाध्यक्षपदी आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांची फेरनिवड

जाचक प्रक्रियेतून कायमची सुटका; ‘एनए’ अट रद्द — जनतेला मोठा दिलासा

जाचक प्रक्रियेतून कायमची सुटका; ‘एनए’ अट रद्द — जनतेला मोठा दिलासा   रत्नागिरी, ता. १३ : राज्य सरकारने जमीन महसूल...
Read More
जाचक प्रक्रियेतून कायमची सुटका; ‘एनए’ अट रद्द — जनतेला मोठा दिलासा

तेलंगणा नगरपालिका निवडणूक: मतपत्रिकेद्वारे मतदानात काँग्रेसची ‘हात’ सरशी; भाजप-बीआरएस पिछाडीवर

तेलंगणा नगरपालिका निवडणूक: मतपत्रिकेद्वारे मतदानात काँग्रेसची ‘हात’ सरशी; भाजप-बीआरएस पिछाडीवर शहरी मतदारांचा कौल काँग्रेसच्या बाजूने; ११६ नगरपालिका आणि ७ महानगरपालिकांमध्ये...
Read More
तेलंगणा नगरपालिका निवडणूक: मतपत्रिकेद्वारे मतदानात काँग्रेसची ‘हात’ सरशी; भाजप-बीआरएस पिछाडीवर

जुनैद सिद्दीकीचे पाच बळी, आर्यांश–सोहेबची तडाखेबंद फलंदाजी; यूएईचा कॅनडावर थरारक विजय

जुनैद सिद्दीकीचे पाच बळी, आर्यांश–सोहेबची तडाखेबंद फलंदाजी; यूएईचा कॅनडावर थरारक विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक...
Read More
जुनैद सिद्दीकीचे पाच बळी, आर्यांश–सोहेबची तडाखेबंद फलंदाजी; यूएईचा कॅनडावर थरारक विजय
Play sound