■ छत्रपती संभाजी महाराजांवरिल आक्षेपार्ह पोस्ट,गुन्हा दाखल
■ नाटे मध्ये तणावाचे वातवरण
■ समिर शिरवडकर-रत्नागिरी.
राजापूर:- ( नाटे) :- शुक्रवार दि.१४ रोजी धुलीवंदन दिवशीच नाटे मधील एका तरूणाने आपल्या व्हाट्सएप वर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक पोस्ट व्हायरल केली.तमाम हिंदुच्या भावना दुखावल्या गेल्या असून,हिंदू मुस्लिम तणाव निर्माण करू पाहणाऱ्या अश्या ह्या तरूणाला धडा शिकविण्यासाठी सकल हिंदू समाज नाटे यांनी नाटे पोलीस ठाणे मध्ये तरुणावर कारवाई साठी निवेदन दिले आहे.आणि यावर राजापूर ठाणे ला गुन्हा नोंद झालेच सुद्धा समजते.
आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण हा नाटे मधील असून सध्या तो रत्नागिरी किव्हा मुबंई मध्ये असल्याचे सुध्दा समजते. राजापूर ठाणे वरुन दोन्ही ठिकाणी शोध घेण्यासाठी पोलीस रावना झालेच सुद्धा समजते.लवकरच आरोपी आमच्या ताब्यात असेल, असेही नाटे ठाणे मधून सांगण्यात आले.