उपोषणाचा इशारा फळास – वाटद मिरवणे ग्रामपंचायतीची घंटागाडी सेवेत
रत्नागिरी, १७ मार्च २०२५ (निलेश रहाटे) – रत्नागिरी तालुक्यातील वाटद मिरवणे ग्रामपंचायतीत १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून घेतलेली घंटागाडी गेल्या वर्षभरापासून सेवेत दाखल करण्यात आलेली नव्हती. स्थानिक लोकांना या सेवेसाठी प्रतीक्षा करावी लागत होती.
माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे मुख्य प्रचारप्रमुख व पत्रकार निलेश रहाटे यांनी दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी लाक्षणिक उपोषणाचा इशारा देत ग्रामपंचायतीला पत्र दिले होते. यानंतर ग्रामपंचायतीने त्वरित दखल घेत दि. १७ मार्च २०२५ पासून घंटागाडी सेवेत रुजू करण्याचा निर्णय घेतला व याबाबतचे पत्र उपोषणकर्त्यांना देण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे उपोषणकर्ते व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत ग्रामपंचायतीचे आभार मानले. या उपक्रमामुळे स्थानिक स्वच्छता व्यवस्थापन अधिक सुकर होणार असून नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
????▶️ या संदर्भातील आमची ही पण बातमी वाचा ????
(संपर्क: निलेश रहाटे, मुख्य प्रचारप्रमुख – माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन)