भारतीय जनता पार्टी, वसई विरार शहर श्री. समर्थ महिला मंडळ आयोजित हळदीकुंकू व खेळ खेळूया पैठणीच्या कार्यक्रमात आमदार राजनजी नाईक यांची प्रमुख उपस्थिती
विरार – संदीप शेमणकर
भारतीय जनता पार्टी, वसई विरार शहर रविवार

दिनांक ९ मार्च २०२५ रोजी. सौ .मृणाली मनिष वैद्य- श्री समर्थ महिला मंडळ तर्फे विरार पूर्व येथील वरदविनायक लेन, महावितरण कार्यालया जवळ विभागातील महिलांसाठी हळदीकुंकू आणि खेळ खेळूया पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्ताने विभागातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित राहुन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी नालासोपारा विधानसभा १३३ चे नवनिर्वाचित आमदार राजनजी नाईक, वसई विरार उपजिल्हाध्यक्ष मनीष दादा वैद्य
व भाजप पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याच प्रमाणे प्रभाग क्रमांक ६ मधील सर्व पदाधिकारी महिला, पुरुष कार्यकर्ते यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केल्या बद्दल सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.