संयुक्त महाराष्ट्र लढा 2.0 उभारण्याचे आवाहन – संयुक्त मराठी मुंबई चळवळमुंबई:

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संयुक्त महाराष्ट्र लढा 2.0 उभारण्याचे आवाहन – संयुक्त मराठी मुंबई चळवळमुंबई:

मुंबई – शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने संयुक्त मराठी मुंबई चळवळीने मराठी माणसाला आपल्या मातीसाठी पुन्हा एकदा संघर्ष करण्याचे आवाहन केले आहे. “मराठी मातीच्या अस्तित्वासाठी संयुक्त महाराष्ट्र लढा 2.0 उभारावा लागेल,” असे या चळवळीतील नेत्यांनी ठणकावून सांगितले.

 

शिवराय न समजणाऱ्यांना आम्हाला राम शिकवायचा अधिकार नाही!

संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील काही घटकांवर सडकून टीका केली. “जे महाराष्ट्रात राहतात आणि छत्रपती शिवरायांचे महानत्व समजून घेत नाहीत, त्यांनी आम्हाला अयोध्येचा प्रभू श्रीराम शिकवावा, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे,” असे खडे बोल सुनावण्यात आले.

 

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पुन्हा उभारण्याची गरज

यावेळी बोलताना चळवळीच्या प्रमुख नेत्यांनी सांगितले की, “संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात लाखो मराठी माणसांनी बलिदान दिले. पण आज पुन्हा मराठी अस्मितेवर गदा येत आहे. जर आपली माती वाचवायची असेल, तर इतिहासाचा धडा गिरवून पुन्हा एकदा संघर्ष करावा लागेल.”

 

मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी पुढे या!

मराठी जनतेला एकत्र येण्याचे आवाहन करत, चळवळीच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, “हा लढा केवळ भाषेचा नाही, संस्कृतीचा आणि अस्तित्वाचाही आहे. जर आज आपण मूग गिळून गप्प बसलो, तर उद्या आपली ओळखच नष्ट होईल.”

 

मराठी माणसाने एकत्र येण्याची गरज

संयुक्त मराठी मुंबई चळवळ ही मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी सातत्याने लढा देत आहे. “शिवरायांची शिकवण अंगी घेतली , तर कोणत्याही बाह्य शक्तीला महाराष्ट्राला तोडता येणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली आणि मराठी जनतेला संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले. आता या चळवळीला किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातमीदार – रमाकांत बने 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...