महाराष्ट्रातील कलाकारांसाठी सुवर्णसंधी – ‘शिव उद्योग संघटने’तर्फे रोजगार आणि व्यवसाय संधी!
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्रातल्या कलाकारांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिव उद्योग संघटनेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सर्व कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासह त्यांना स्थिर रोजगार आणि व्यवसाय संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
पथनाट्य टीम – सामाजिक आणि प्रबोधनात्मक नाट्य सादरीकरणासाठी, कॉमेडी क्लब – विनोदवीरांना व्यासपीठ, हास्य कवी संमेलन – कवींसाठी व्यासपीठ, कराओके ऑर्केस्ट्रा – नवोदित गायक, कलाकारांना व्यासपीठ, जागरण-गोंधळी – पारंपरिक लोककलांसाठी व्यासपीठ, लघुपट महोत्सव – नवोदित दिग्दर्शक आणि कलाकारांसाठी व्यासपीठ, तसेच इतर सर्व कलाक्षेत्रांतील कलाकारांना रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत.
संघटनेचे पदाधिकारी संजय डुबल 91728 30799 यांच्याशी संपर्क साधून कलाकारांनी आपली नावनोंदणी करावी. तसेच, कोणत्याही कलाकाराकडे रोजगारविषयक नवीन कल्पना असल्यास त्या संघटनेच्या माध्यमातून साकार करण्याचा प्रयत्न केला जाईल. कलाकारांनी ही सुवर्णसंधी दवडू नये आणि आपल्या कारकीर्दीला नवीन दिशा द्यावी!

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.