राज्यातील वाहनचालकांना दिलासा – एचएसआरपी फिटमेंट सेंटर वाढणार!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील वाहनचालकांना दिलासा – एचएसआरपी फिटमेंट सेंटर वाढणार!

banner

 

नागपूर: उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसवण्याच्या प्रक्रियेत वाहनचालकांना अनेक अडचणी येत होत्या. त्यासाठी राज्य परिवहन आयुक्त कार्यालयाने मोठा निर्णय घेतला असून, आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि शहरात HSRP फिटमेंट सेंटरची संख्या वाढवली जाणार आहे.

 

राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सगळ्या वाहनांसाठी HSRP बसवण्याचे काम तीन एजन्सींकडे सोपवले आहे. हे काम १ जानेवारी २०२५ पासून सुरू झाले असले तरी त्याचा वेग अत्यंत संथ आहे. फिटमेंट सेंटरची कमी संख्या आणि ऑनलाईन अपॉईंटमेंट प्रक्रियेत अडथळे ही प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे.

 

नवीन आदेशानुसार:

 

प्रत्येक RTO कार्यालयाला त्यांच्या हद्दीत अधिकृत एजन्सीमार्फत नवीन फिटमेंट सेंटर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

 

मोटर वाहन निरीक्षकांना फिटमेंट सेंटर तपासून लवकर मंजुरी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

२५ हून जास्त वाहनांना HSRP बसवायची असल्यास, कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता सोयीच्या ठिकाणी बसवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

 

 

१ एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या वाहनांसाठी कठोर कारवाई:

 

१ एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या वाहनांसाठी वितरकांना HSRP बसवणे बंधनकारक होते. मात्र, काही वितरकांनी पाटी न बसवता वाहने वितरित केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे अशा वितरकांवर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

 

HSRP बसवण्याची मुदतवाढ:

 

वाहनधारकांच्या सोयीसाठी परिवहन विभागाने HSRP बसवण्याची अंतिम मुदत ३० जून २०२५ पर्यंत वाढवली आहे.

 

सुरुवातीला अंतिम तारीख ३० एप्रिल २०२५ होती, मात्र वाहनधारकांच्या अडचणी लक्षात घेता ती पुन्हा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता वाहनधारकांना ३० जून २०२५ पर्यंत HSRP बसवण्याची संधी मिळणार आहे.

 

वाहनधारकांनी वेळेत HSRP बसवून दंड आणि कारवाई टाळावी, असे आवाहन प

रिवहन विभागाने केले आहे.

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...