ग्रामीण रुग्णालयात साेमवारी २४/०३/२०२५ रोजी पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रामीण रुग्णालयात साेमवारी २४/०३/२०२५ रोजी पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन…

banner

सोलापुर :
मंगळवेढा (प्रतिनिधी)

मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातील पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले असून याचा पत्रकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुलोचना जानकर यांनी केले आहे.

प्रसार माध्यम हे देशाचा चौथा आधारस्तंभ असून लोकशाहीत पिडीत लोकांना न्याय देण्याचे काम सातत्याने धकाधकीच्या जीवनात करीत असतो.

या दरम्यान तो आपले कर्तव्य पार पाडताना शरीराची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शुगर,बी.पी. व अन्य आजार उद्भवतात, परिणामी त्याकडे लक्ष देण्यासही त्यांच्याकडे वेळ नसतो याची दखल घेवून मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधिक्षक डॉ.सुलोचना जानकर यांनी सोमवार दि.२४/०३/२०२५ रोजी दुपारी २ ते ४ यावेळी पत्रकाराचे शिबीराचे आयोजन करण्यात आले असून शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

या शिबीरासाठी डॉ.प्रणव कदम,
डॉ.वैद्य,
डॉ.सुरज साठे,
व अन्य कर्मचारी यासाठी परिश्रम घेत आहेत.

 

बातमीदार.

नंदकुमार बगाडेपाटिल आहिलयानगर.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...